road accident, Maharashtra, morgaon, baramati,Pune  
पुणे

बारामती जवळ चार वाहनांचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

सकाळ ऑनलाईन टीम

बारामती : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात  चार वाहने पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. मोरगाव बारामती रस्त्यावर मेडद नजीकच्या पेट्रोलपंपासमोर हा भीषण अपघात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन पिकअप गाड्या, एक मारुतीची इको कार तसेच एक तवेरा अशा चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या वाहनांतून प्रवास करणारे काही लोक जखमी झाल्याचे समजते. नेमके किती लोक वाहनातून प्रवास करत होते हे समजू शकलेलं नाही.  

या अपघाताची माहिती मिळताच सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी तात्काळ  रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास मदत झाली. बारामती तालुका पोलिसही अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. अपघाताचे कारण ओव्हरटेक असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्याचे सुरु असलेले काम व भरधाव वेगाने वाहने चालविण्याच्या प्रकारामुळे अपघात झाल्याचेही काहींचे म्हणने आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Elections: प्रचाराला आणलेल्या महिला प्रतिस्पर्धी उमेदवाराने पळवल्या, पण पैसे न दिल्याने तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

US Tariff On India : रशियन तेलावरून वाद पेटला; भारतावर 500% टॅरिफ? ट्रम्प यांचा मोठा निर्णय

IND vs NZ : तिलक वर्माच्या जागी T20 संघात कोणाला मिळणार संधी? ऋतुराज गायकवाडसह मुंबईकर फलंदाज शर्यतीत, कोण मारणार बाजी?

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT