Harshwardhan Patil Sakal
पुणे

इंदापुरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रस्ता रोको

शासन व महावितरणने शेतकऱ्यांचे वीज जोड तातडीने जोडावेत, शेतकऱ्यांना दिवसा १० तास नियमित वीज द्यावी, पुरविलेल्या विजेच्या बिलाची आकारणी तासानुसार करावी.

डॉ. संदेश शहा

शासन व महावितरणने शेतकऱ्यांचे वीज जोड तातडीने जोडावेत, शेतकऱ्यांना दिवसा १० तास नियमित वीज द्यावी, पुरविलेल्या विजेच्या बिलाची आकारणी तासानुसार करावी.

इंदापूर - शासन (Government) व महावितरणने (Mahavitran) शेतकऱ्यांचे वीज जोड (Electricity Connection) तातडीने जोडावेत, शेतकऱ्यांना (Farmer) दिवसा १० तास नियमित वीज द्यावी, पुरविलेल्या विजेच्या बिलाची आकारणी तासानुसार करावी. तसेच, आकारलेल्या वीजबिलांची (Electric Bill) तातडीने दुरुस्ती करावी. आदी मागण्यासाठी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर मालोजीराजे चौकात दोन तास रस्ता रोको आंदोलन (Agitation) करण्यात आले. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपला असंतोष व्यक्त केला. सरकारची सावकारकी थांबवली जाईल तसेच अधिवेशन संपण्यापूर्वी शेतीपंपांचे तोडलेले वीजजोड जोडण्यास राज्य सरकारला भाग पाडले जाईल, असे आश्वासन विधानसभेतील विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, सरकारने तसा निर्णय दोन दिवसात न घेतल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाविकास आघाडी पाणी असताना देखील शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. तालुक्याचे लोक प्रतिनिधी दत्तात्रय भरणे हे राज्य मंत्री मंडळात आहेत मात्र त्यांना शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही. ते पालकमंत्री असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सुरज जाधव या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली मात्र हे तिकडे न जाता तालुक्यात घोड्यावर, रथावर बसून मटनावर ताव मारत आहेत. हे निष्क्रिय मंत्री आहेत. मात्र आम्ही सुरज जाधव यांच्या कुटुंबापर्यंत मदत पोहोचवणार आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, विजेच्या प्रश्नावर आतापर्यंत चार वेळा आंदोलन झाली तरी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे.त्यामुळे या प्रश्नावर शासनाने ठोस भूमिका न घेतल्यास राज्यात इंदापूर आंदोलनाचा पॅटर्न प्रसिद्ध होईल. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे व करणसिंह घोलप, बाबासाहेब चवरे, बाबामहाराज खारतोडे, मारुतराव वणवे, ऍड. कृष्णाजी यादव, तानाजी थोरात, मोहन दुधाळ, युवराज म्हस्के, भाजप तालुकाध्यक्ष ऍड शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद आदींची भाषणे झाली.

यावेळी भरत शहा, देवराज जाधव, लालासाहेब पवार, रघुनाथ राऊत, मयुरसिंह पाटील, गजानन वाकसे, गोरख शिंदे, अशोक इजगुडे, बाळासाहेब पाटील, कैलास कदम उपस्थित होते. बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार घडला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT