1) आंबेगाव पठार ः रस्त्यावर पसरलेला कचरा उचलताना कर्मचारी. 2) कचरा टाकू नये यासाठी रस्त्यावर पहारा देत बसलेले कर्मचारी. 
पुणे

कर्मचाऱ्यांच्या दक्षतेने रस्ता चकाचक

सकाळवृत्तसेवा

पुणे - नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर फेकून देऊ नये यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र आंबेगावातील रस्त्यावर खडा पहारा देऊन शिस्त लावली. त्यामुळे आता हा रस्ताही चकाचक झाला असून, नागरिक कचरा थेट महापालिकेकडे जमा करीत आहेत. 

आंबेगाव पठार येथील सर्वे क्रमांक १५, १६ येथे चिंतामणी ज्ञानपीठ ते साई सिद्धी चौकादरम्यानच्या डीपी रस्त्यावर परिसरातील नागरिक कचरा फेकत होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसातून कितीही वेळा कचरा उचलला, तरी थोड्या वेळात पुन्हा तेथे ढीग लागत होता. महापालिकेचे कर्मचारी अरुण कांबळे, स्वप्नील वायदंडे, अजय रोडगे, आदिनाथ जाधव, कांता कांबळे, पूजा घोडके या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सलग आठ दिवस जगजागृती केली. कचरा महापालिकेच्या घंटागाडीतच टाकावा, यासाठी आवाहन केले.

तरीही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी स्वत: दिवसरात्र रस्त्यात थांबून कचरा टाकण्यास मज्जाव केला. परिसरातील काही सजग नागरिकही कांबळे यांच्या मदतीला आल्यामुळे येथे कचरा टाकणे बंद झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT