esakal 
पुणे

खड्डे बुजविल्यास वाहतूक सुधारेल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘हिंजवडीतील वाहतूक समस्या’ हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील प्रस्तावित मेट्रोचे काम सुरू होणार आहे. त्यानंतर येथील वाहतूक समस्येत भर पडू शकते. ‘मेट्रोपूर्वी हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडावी’, ही बातमी ‘सकाळ’ने मंगळवारच्या (ता.४) अंकात प्रसिद्ध केली होती. त्या बातमीला नागरिकांकडून ई-सकाळवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत त्यांनी काही सूचना केल्या असून, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत.

पाषाण-सूस, नांदे चांदे-हिंजवडी या रस्त्यावरून दररोज सुमारे एक हजार वाहने ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्‌डे बुजविले तरी वाहतुकीत चांगला फरक पडेल. हिंजवडीमध्ये नो पार्किंग केले, तर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. वाकड पुलाजवळील अतिक्रमण काढून रस्ता थोडा रुंद केल्यास वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. 
- आदित्य

वाकड पुलाखाली वाहतूक पोलिस घोळक्‍याने थांबलेले असतात. ते मनुष्यबळ शिवाजी चौक आणि विप्रो सर्कलजवळ वापरले गेल्यास तेथील समस्या सुटण्यास मदत होईल.
- जेम्स 

आयटी पार्कमुळे या भागातील लोकवस्ती वाढत चालली आहे. अनेक नवे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून या भागात पर्यायी रस्ते तयार करण्याची आवश्‍यकता आहे. 
- राहुल 

चांगले आणि भक्‍कम रस्ते तयार करण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्‌डे पडले, की वाहतुकीचे तीन तेरा वाजतात. आयटी पार्कमधील रस्ते चांगले करण्यासाठी येथील कंपन्यांनी निधी देण्याची आवश्‍यकता आहे. 
- हरी 

हिंजवडी परिसर रिंगरोडला जोडल्यास येथील वाहतूक प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागेल. 
- राजू फुटाणे 

सूस गावातून माणकडे जाणारा रस्ता चांगल्या प्रकारे दुरुस्त केल्यास पाषाण, बावधनमधून येणाऱ्या नागरिकांना थेट फेज तीनमध्ये जाता येणार आहे. 
- समीर चव्हाण 

आयटी कंपन्यांमधील कर्मचारी बऱ्याचदा एकट्यासाठी मोटार घेऊन येतात. येथील वाहतुकीचा विचार करून ते कितपत बरोबर आहे, याचा विचार त्यांनी करण्याची आवश्‍यकता आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा भक्‍कम झाल्यास, वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते. 
- नीलेश शेलार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT