पुणे

कऱ्हाड शाहूचौकात पॅचवर्कींग सुरू

CD

पॅचवर्कच्या कामाला पावसाचा अडसर

शाहू चौकात खड्डे बुजवणे सुरू; आमदार डॉ. भोसलेंच्या सूचनेनंतर काम

कऱ्हाड, ता. २ ः शासकीय विश्रामगृह परिसरातील दुरवस्था झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवली आहे. पॅच वर्किंगच्या कामाला आज सुरुवात केली. शाहू चौक परिसरातील खड्ड्यांचे पॅचवर्क हाती घेतले. मात्र, पावसामुळे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवावे लागले. खड्डे पूर्णपणे सुकल्यावर पुन्हा गतीने काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली.
आमदार डॉ. भोसले यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली होती. रस्त्यासाठी ६९ लाखांचा निधी मंजूर झाला असून, पावसाळ्यानंतर पक्क्या रस्त्याचे काम सुरू होणार आहे; परंतु तोपर्यंत जुन्या कोयना पुलावरून शहरात ये-जा करणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. त्यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम व पालिकेने आज तातडीने शाहू चौकातील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले. काम सुरू असतानाच पाऊस पडला. त्यामुळे डांबरीकरणाचे काम सुरक्षिततेचा उपाय म्हणून थांबवले.

W46704
कऱ्हाड ः शाहू चौकातील पॅचवर्किंगच्या काम सुरू झाले. मात्र, दुपारनंतर पावसाने काम तात्पुरते थांबविण्यात आले.

............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्याविरोधात पोलिस तक्रार देणार; शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णींकडून 'नक्षली' असा उल्लेख

सायबर कॅफेतून सुरू झाला प्रवास, २७-२८ चित्रपटांचा अनुभव; आता रोहन शाह करणार निर्मितीची नवी सुरुवात

Champions Trophy Dates: भारतात महिला वर्ल्ड कपनंतर रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी! कधी अन् कोणत्या शहरात होणार सामने? ICC ची घोषणा

Mumbai ST Stop Demand: मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर एसटी बसला चेलाडी फाटा येथे अधिकृत थांबा देण्याची आमदार शंकर मांडेकर यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी

पहिलीच मालिका हिट पण नंतर कुठे गायब झाली 'येऊ कशी तशी मी नांदायला'ची स्वीटू? करिअरच्या टॉपवर असतानाच घेतलेला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT