पुणे

रस्त्याची दुरवस्था नागरिकांसाठी घातक

CD

घोरपडी, ता. ३ : बी. टी. कवडे रस्त्यावरील थोपटे चौकात पेव्हर ब्लॉकचा रस्ता आणि सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या मध्यभागी मोठी फट निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. फटीमुळे ठिकाणी दररोज सात ते आठ अपघात होत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची अशी दुरवस्था कायम असून आतापर्यंत तीन वेळा दुरुस्ती केली आहे. मात्र प्रत्येकवेळी काही महिन्यांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुरुस्ती करताना दर्जेदार साहित्य न वापरणे, योग्य नियोजन न करता काम केल्यामुळे ही समस्या वारंवार उद्भवत आहे.
या मार्गावर शाळा, दुकाने आणि निवासी वसाहती असल्याने सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना या रस्त्यावरून जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे. काही अपघातांमध्ये नागरिकांना गंभीर दुखापत झाली असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या मार्गावरून वाहने चालणे अवघड झाले आहे. महापालिकेकडे तक्रारी करूनही दीर्घकाळ ठोस कारवाई न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. दुरुस्ती होईपर्यंत या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सूचना फलक, अडथळे आणि रात्रीसाठी प्रकाश व्यवस्था तातडीने उभारावे. सर्व रस्त्यावरील चेंबरचे झाकण खोल गेल्यामुळे रस्त्याशी समांतर राहिली नाहीत. वाहने चालवताना तोल जाऊन अपघात होत आहेत.
- दीपक फडतरे, स्थानिक नागरिक.

प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. रस्त्याची मजबुतीने पुनर्बांधणी करून पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट रस्त्याचा जोड सुयोग्य पद्धतीने करण्यात येईल. तसेच भविष्यात पुन्हा फट पडू नये यासाठी तांत्रिक उपाय केले जातील.
- कुणाल धुमाळ, सहाय्यक आयुक्त, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

Latest Marathi News Live Update : योग्य मोबदल्यासाठी मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; इंदोर महामार्गावर वाहतूक ठप्प

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

Karnataka Budget Protest : अर्थसंकल्पाविरोधात भाजपचे ‘खाली चंबू’ आंदोलन; सरकारवर कर्जबाजारीपणाचा आरोप, विधानसौधसमोरून काढला मोर्चा

SCROLL FOR NEXT