Pune-Traffic Sakal
पुणे

पुणे : 31 डिसेंबर व 1 जानेवारीनिमित्त वाहतुकीत बदल

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे - नववर्षाच्या स्वागतासाठी (New Year) शुक्रवारी (ता.31 ) रात्री लष्कर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, तर शनिवारी (ता.1) नववर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त मध्यवर्ती भागात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे वाहतुक कोंडी (Traffic) होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (Chhatrapati shivaji maharaj road) तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद (Close) ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

शुक्रवारी (ता.31) नववर्षाच्या स्वागतासाठी लष्कर परीसरातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता या ठिकाणी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सात वाजल्यापासून ते गर्दी संपेपर्यंत लष्कर परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. तर शनिवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन चारचाकी वाहने व सर्व प्रकारच्या बसला वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

बंद रस्ते व पर्यायी मार्ग

- वाय जंक्‍शनवरुन महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतुक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून हि वाहतुक कुरेशी मशीद, सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात आली आहे

- ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे.

- व्होल्गा चौकाकडून महमद रफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद. सदरची वाहतुक ईस्ट स्ट्रीट रोडने सरळ इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल

- इंदिरा गांधी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद. सदरची वाहतुक इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलिस ठाण्याकडे वळविण्यात आली आहे.

- सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद. हि वाहतुक ताबुत स्ट्रीट मार्गे पुढे जाईल.

नो-व्हेईकल झोन (31 डिसेंबर सायंकाळी सात ते 1 जानेवारी 20222 पहाटे 5 पर्यंत)

- फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता - नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार

- जंगली महाराज रस्ता - झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक

- महात्मा गांधी रस्ता - हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकीपर्यंत)

शनिवारी (ता. 1) छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तात्पुरत्या स्वरुपात बंद. पर्यायी रस्ते

- पुरम चौकातुन बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी टिळक रस्त्याने टिळक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जावे

- छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो.बर्वे चौकातुन जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक रस्त्याने पुढे जावे

- स.गो.बर्वे चौकातुन महापालिका भवनाकडे जाणारी वाहतुक स.गो.बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता,झाशीची राणी चौक मार्गे महापालिका भवनकडे जातील

- अप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करून हि वाहतुक बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जाईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT