पुणे

राजगुरुनगरला रस्ता रुंदीकरण

सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर - राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या आणि नेहमी वाहतूक कोंडी होत असलेल्या पुणे-नाशिक महामार्गाच्या तीन किलोमीटर भागाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे रुंदीकरण झाल्यावर वाहतूक कोंडीतून काही अंशी दिलासा मिळणार आहे.  

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर टप्प्यावरील ज्या रस्त्यांना बाह्यवळण आहे; तेथील आतील महामार्गाची खास बाब म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे १८ डिसेंबर रोजी भेट घेऊन केली होती. शिरूर लोकसभा मतदार संघातील राजगुरुनगर, नारायणगाव, मंचर, कळंब व आळेफाटा या पाच रस्त्यांच्या २८ किलोमीटर लांबीच्या नूतनीकरणासाठी १२५ कोटी निधी मंजूर करावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे सांगत गडकरी यांनी फक्त राजगुरुनगर व नारायणगाव या दोन शहरांच्या अंतर्गत महामार्गाच्या सुमारे साडेनऊ किमी लांबीच्या कामांसाठी सुमारे ३९ कोटी रुपये मंजूर केले होते.  त्यानुसार राजगुरुनगरला तुकाईवाडीचे स्वामीनी हॉटेल ते चांडोली टोलनाक्‍यापर्यंतच्या ३.७६ किमी लांबीच्या रस्त्याला १५ कोटी ९९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक होते. त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली. रोडवे सोल्यूशन कंपनीने हे काम अंदाजपत्रकापेक्षा २१ टक्के खाली जाऊन घेतले. मात्र, या कामाची निविदा घेतलेली ठेकेदार कंपनी काम सुरू करीत नव्हती. मध्यंतरी वाहतूक कोंडीवरून झालेल्या गदारोळामुळे प्रशासन आणि खासदार आढळराव यांनी याबाबत हालचाली करून महामार्ग प्रशासनाकडे काम करावे यासाठी रेटा लावला. ते काम आता सुरू झाले आहे. त्यामध्ये या जुन्या महामार्गाचे ७ मीटरवरून १० मीटरपर्यंत रुंदीकरण, बाजूला गरज असेल तेथे सिमेंट ब्लॉकचा पादचारी मार्ग, सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था आणि रस्त्याची दुरुस्ती, अशी कामे करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिकनिक अभिनेत्रीच्या जीवावर बेतली ! कुटूंबासहित हत्या करून फार्महाऊसवर गाडलं; 13 वर्षांनी मिळाला न्याय

FAFO Parenting: फार झाले मुलांचे लाड! आता व्हा FAFO आई-वडील; जेन अल्फा पॅरेंटिंगमधील नवा ट्रेंड व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदच्या 73 जागांसाठी उद्या मतदान

प्राजक्ता माळीने बनवला कोकणातल्या घराघरात बनणारा खास पदार्थ; व्हिडिओ पाहून अमृता खानविलकर म्हणते-

Islamabad Blast: मोठी बातमी! इस्लामाबादमध्ये नमाज दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट; ५० हून अधिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT