anwar1.jpg 
पुणे

विमाननगरमधील बत्तीस वर्षांनंतरही रस्ते  अद्याप बंदच 

-अन्वर मोमीन --------------------

पुणे ः महापालिकेने 1987 च्या विकास आराखड्यातील विमाननगरमधील रस्ते बत्तीस वर्षांनंतरही वाहतुकीसाठी अद्याप खुले केलेले नाहीत. काही खासगी जागामालकांनी तर महापालिकेकडून मोबदला घेऊनही अद्याप जागा ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे हे रस्ते तातडीने खुले करून विमाननगरमधील वाहतुकीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नगरसेविका श्वेता गलांडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

सध्या विमाननगरमधील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ विमाननगरला लागून असल्यामुळे प्रवाशांना घ्यायला व सोडविण्यासाठी येणाऱ्या हजारो गाड्या विमाननगरमधून ये-जा करतात. त्यामुळे विमाननगरमधील सर्व चौकांत सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. विमाननगरच्या अंतर्गत भागात वाहतूक नियंत्रक दिवे बसवूनही वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. जर विमाननगरमधील विकास आराखड्यात दर्शवण्यात आलेले रस्ते खुले झाले, तर वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. सध्या विमाननगरमधील अंतर्गत रस्त्यांना पर्यायी मार्ग नाहीत. 

महापालिकेने विमाननगरमधील सर्व्हे नंबर 230-ए आणि 228 मधील डीपी रस्ते वाहतुकीसाठी खुले केले नाही, यामुळे व्हीआयपी मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता बंद आहे. याप्रमाणेच नगर रस्त्यावरून स्केटिंग ट्रॅक चौकात येणारा रस्ता बंद आहे. यामुळे एकाच रस्त्यावर वाहतुकीचा ताण येतो. 

कोंडीमुळे विमानप्रवास हुकण्याची शक्‍यता 

विमाननगर येथील निको गार्डन, फिनिक्‍स मॉलसमोर, दत्त मंदिर चौक, साकोरेनगर आणि विमानतळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. साकोरेनगर आणि सिंम्बॉयसिस कॉलेज या चौकामध्ये सायंकाळी पाचशे मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा असतात. वाहने कासव गतीने पुढे जातात. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे विमान प्रवासाला मुकावे लागेल, अशी स्थिती निर्माण होते. 


""सर्व्हे नंबर 230 मधील 18 मीटर डीपी रस्त्याची जागा बदलण्यात आली आहे. यामुळे विमाननगरमधून व्हीआयपी रस्त्याला जोडणारा रस्ता एका जागेवर येऊन बंद झाला आहे. या डीपी रस्त्याचा नागरिकांना काहीच उपयोग होणार नाही.'' 
- श्वेता गलांडे, नगरसेविका 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT