रस्त्याच्या कामावरून वाद;
जातिवाचक शिवीगाळ
करमाळा, ता. २० ः झरे (ता. करमाळा) येथे रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादात जातिवाचक शिवीगाळ करून दमबाजी केल्याप्रकरणी धर्मराज घाडगे, अजय घाडगे व विजय घाडगे या तिघांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी झरे येथील २१ वर्षीय तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, गावातील धर्मराज घाडगे हे रस्त्याचे काम करीत असून, हा रस्ता फिर्यादीच्या घराजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामास फिर्यादीचा विरोध असल्याने त्यावरून वाद झाला. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १९ वाजता धर्मराज घाडगे यांनी जातिवाचक शिवीगाळ करून दमबाजी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता अजय घाडगे यांनी थार वाहन फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच दगड फेकून मारला आणि जातिवाचक शिवीगाळ केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. धर्मराज घाडगे, अजय घाडगे व विजय घाडगे यांनी मिळून दोन वेळा जातिवाचक शिवीगाळ करून दमबाजी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी तिघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.