Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : चोरट्यांनी लष्करी जवानासह सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लुबाडले

चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला धमकावून त्यांचाही मोबाईल हिसकावून घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चोरट्यांनी लष्करातील जवानासह सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन रोकड आणि मोबाईल असा सुमारे १७ हजारांचा मुद्देमाल हिसकावून नेला. ही घटना घोरपडी येथील सोपानबाग परिसरात कॅनॉल रस्त्यावर घडली.

या प्रकरणी परशुराम बसप्पा नगराळे (वय ३९, रा. मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वानवडी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगराळे हे मागील दोन वर्षांपासून मुंढवा येथील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये वाहनचालक आहेत.

ते शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोपानबाग परिसरातून कॅनॉल रस्त्याने सायकलवर जात होते. त्या वेळी तीन अनोळखी व्यक्ती सुरक्षारक्षक मोहित छोटेलाल साकेत यांना रस्त्यात अडवून मारहाण करीत होते.

नगराळे यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यापैकी एकाने नगराळे यांना दगड फेकून मारला. चोरट्यांनी नगराळे यांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून त्याचा पासवर्ड घेतला. त्यांची सायकल कॅनॉलमध्ये फेकून दिली. तसेच, चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला धमकावून त्यांचाही मोबाईल हिसकावून घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT