पुणे

भुरट्या चोरांची नजर आता प्रवाशांवर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील भुरट्या चोरांनी आता आपली नजर प्रवाशांवर वळविली आहे. एसटी बस स्थानक, रेल्वे स्थानक, खासगी वाहने थांबण्याची ठिकाणे हेरून प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकार घडत असल्याचे आढळले आहे. हत्याराचा धाक दाखवून प्रवाशांकडून महागड्या वस्तू, रोकड पळविली जात आहे. खडकी पोलिसांनी अशा काही चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

शहरातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे रेल्वे स्थानक येथील बस स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रेल्वे स्थानक परिसर तर नेहमीच गजबजलेला असतो. या ठिकाणी रात्री उशिरा व पहाटे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. काही प्रवासी बस स्थानकातच असल्याने एकट्या प्रवाशांना गाठून त्यांच्याकडील मौल्यवान साहित्य, रोख रक्कम, मोबाईल व अन्य वस्तू लुटण्याचे प्रकार चोरट्यांकडून केले जातात. 

पंधरा दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथे रात्रीच्यावेळी उतरलेल्या संतोष रामचंद्र धर्माधिकारी (वय २४, रा. नगर) यांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटल्याची घटना उघडकीस आली होती. धर्माधिकारी हे शिवनेरीने कोल्हापूरहून पुण्यात आले होते. त्यांना पुण्यात उतरून नगरला जाण्यासाठी ते पाटील इस्टेट परिसरात थांबले असताना तिघांनी त्यांना लुटले होते. याप्रकरणी त्यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिस कर्मचारी किरण घुटे व उत्तम कदम यांनी शोध घेतला. पोलिसांनी राकेश जॉन सकट (वय १९), किरण रमेश गालफाडे (वय २१, दोघेही रा. मंगळवार पेठ) या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ मोबाईल आणि दुचाकी जप्त केल्या.

त्यामुळे अशा भुरट्या चोरट्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT