पुणे, ता. ५ : एरंडवणे येथील एस हॉस्पिटलने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल युरोसर्जनच्या बळावर युरोलॉजी क्षेत्रात १०० रोबोटिक शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण केला आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते ९२ वर्षांच्या ज्येष्ठ रुग्णांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
तर, एका रुग्णावर करण्यात आलेली ‘एंडोलॅप्रोस्कोपिक पायलोलिथोटोमी’ आणि ‘बक्कल म्युकोसल ग्राफ्ट’ ही जगातील पहिलीच रोबोटिक शस्त्रक्रिया ठरली असून, याची नोंद जर्मनीतील ‘जर्नल ऑफ रोबोटिक सर्जरी’मध्ये घेतली आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सागर पाटणकर यांनी दिली. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध रोबोटिक सर्जिकल सिस्टमच्या साहाय्याने प्रोस्टेट, किडनी आणि मूत्राशयाशी संबंधित आजारांवर उपचार, पार्शल नेफ्रेक्टॉमी, प्रोस्टेट कॅन्सर सर्जरी आणि मूत्रमार्गाच्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांचा समावेश आहे. यामध्ये प्रशिक्षित सर्जिकल टीमचे कौशल्य महत्त्वाचे असल्याचे रोबोटिक युरो सर्जन डॉ. गुरुराज पडसलगी यांनी सांगितले.
युरोलॉजी उपचारांच्या क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून ‘लेझर ते रोबोटिक’ असा प्रवास हॉस्पिटलने केला आहे. पुण्यातील रुग्णांना आधुनिक युरोलॉजी उपचार आणि अनुभवी तज्ज्ञांची टीम एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आमचा प्रयत्न आहे.
- प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, संस्थापक, एस हॉस्पिटल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.