patel hospital 
पुणे

रोबो उतरलाय कोरोनाच्या लढाईत; जपानमध्ये नव्हे, आपल्या पुण्यात!

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांची सेवा आता "रोबोट'च्या माध्यमातून करण्यात येत आहे. वॉर्डमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना अनेकदा त्रास होत असतो. ही बाब लक्षात घेऊन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आय. टी. आय. विभागाचे प्राचार्य विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक प्रवीण शिंदे आणि सोमनाथ तिडके यांनी स्वयंचलित रोबोट तयार केला आहे. त्यामुळे या वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

पुणे शहरासह कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामधील काही रुग्णांना उपचारासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल तयार करण्यात आलेल्या कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. या वॉर्डमध्ये सुमारे सत्तर रुग्ण सामावतील एवढी सोय करण्यात आली आहे. 

इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

वॉर्डमध्ये डॉक्‍टर, परिचारिका आणि वॉर्डबॉय कार्यरत आहेत. मात्र, आता या रोबोटची मदत कोविड बाधित रुग्णांच्या वॉर्डमध्ये घेण्यात येत आहे. या रोबोटच्या माध्यमातून रुग्णांना पाणी, चहा, नाष्टा आणि जेवण देण्यात येत आहे. या रोबोटची चाचणी नुकतीच घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता हा रोबोट पूर्ण क्षमतेने या वॉर्डमध्ये काम करू लागला आहे. रोबोट म्हणजे एक प्रकारचे छोटे वाहन आहे. या रोबोटचे नियंत्रण मात्र वॉर्डमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांकडे देण्यात आले असून त्यांना रोबोट कसा चालवावा याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. 
 

पटेल रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोविड बाधित रुग्णांना तत्पर सेवा मिळावी, या उद्देशाने रोबोट तयार करण्यात आला आहे. यासाठी केवळे पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला आहे. 
-विजय चव्हाण, प्राचार्य , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आयटीआय 
 

कोविड बाधित रुग्णांच्या सेवेसाठी बोर्डाच्या आयटीआय विभागातील शिक्षकांनी तातडीने रोबोट तयार केला आणि तेवढ्याच तत्परतेने वॉर्डसाठी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
- डॉ. विद्याधर गायकवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी, सरदार पटेल रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT