रोबोटिक्स तंत्रज्ञान ठरेल आधुनिक प्रगतीचे प्रवेशद्वार
डॉ. अजिंक्य सगरे; मोबाईल ॲप्लिकेशन व स्क्वेअर वेव ऑफिसचा उत्साहात प्रारंभ
सातारा, ता. ९ ः उद्योगविश्वातील पारंपरिक कार्यप्रणाली बदलत्या काळात कालबाह्य ठरत असून, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व रोबोटिक्स तंत्रज्ञान हेच भविष्यात उद्योगविश्वाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रवेशद्वार ठरणार असल्याचे मत यशोदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी व्यक्त केले.
सातारा येथे स्क्वेअर वेव ऑटोमेशन टेक्नॉलॉजीच्या नवीन प्रोजेक्ट ऑफिसच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी क्युबिक्स ऑटोमेशन प्रा.लि. पुणे येथील मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश जोशी, गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, कुका रोबोटिक्सचे सुबोध पाटील, क्युबिक्स ऑटोमेशनचे अविनाश महामुनी, स्क्वेअर वेवचे संस्थापक संचालक तुषार इनामदार, संचालक जयंत इनामदार, संचालिका हर्षदा इनामदार आदी उपस्थित होते.
डॉ. सगरे म्हणाले, ‘‘उद्योजकीय तंत्र कौशल्याने मनुष्यबळ निर्मिती ही काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची नितांत गरज आहे. स्क्वेअर वेव ही उणीव भरून काढण्यासाठी कटिबद्ध आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’ यावेळी श्री. काटेकर, तुषार इनामदार, अविनाश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
सातारा ः स्क्वेअर वेवच्या नूतन ऑफिसच्या प्रारंभप्रसंगी डॉ. अजिंक्य सगरे. त्या वेळी अविनाश जोशी, श्रीरंग काटेकर, सुबोध पाटील, अविनाश महामुनी, तुषार इनामदार आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.