रॉक पूल्स Sakal
पुणे

‘रॉक पूल्स’चे पाणी पिण्यायोग्य; संशोधनातून माहीती समोर

पश्‍चिम घाटातील पठारावर आघारकर संशोधन संस्थेचे संशोधन

अक्षता पवार

पुणे : पश्‍चिम घाटातील बहुतांश पठारांवर अनेक छोटी तळी किंवा ‘रॉक पूल्स’ आढळतात. या तळ्यांमधील पाणी पठारांवरील जैवविविधतेला जगविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. तसेच हे पाणी पिण्यायोग्य असण्याची बाब नुकतीच एका संशोधनातून समोर आली आहे.

पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्यावतीने (एआरआय) ‘वॅनिशिंग वॉटर्स: वॉटर केमिस्ट्री ऑफ टेम्प्ररी रॉक पूल्स ऑफ वेस्टर्न घाट’ या नावाचा एक शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला. यात ही बाब समोर आली. या संशोधनात संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. कार्तिक बालासुब्रमनीयन, डॉ. प्रणव क्षीरसागर, डॉ. मंदार दातार यांच्या मार्गदर्शनाखाली अबोली कुलकर्णी, एम. विग्नेश्वरन, स्मृती विजयन, भूषण शिगवण, सुरजित रॉय आदींनी सहभाग घेतला. हा प्रबंध नुकताच ‘वॉटर प्रॅक्टीस ॲण्ड टेक्नॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

डॉ. कार्तिक यांनी सांगितले, ‘‘जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पिण्यायोग्य पाण्यासाठी दिलेल्या मापदंडानुसार पश्‍चिम घाटातील या ‘रॉक पूल्स’मध्ये उपलब्ध असलेले पाणी नेमके कसे आहे? ते पिण्यायोग्य आहे का? याचा अभ्यास करण्यात आला. यासाठी ३३ पठारांवर तयार झालेल्या ८० रॉक पूल्सचे सर्वेक्षण करत त्यांच्या रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला. पाण्याचा सामू, कंडक्टीव्हिटी, त्यातील अनायन, सल्फर, मॅग्निशियम आदी घटकांचा अभ्यास केला.’’

‘रॉक पूल्स’ म्हणजे काय?

सह्याद्रीतील पठारांवर नैसर्गिकरीत्या तयार झालेले खड्डे, ज्यांत वर्षानुवर्षे पावसाचे पाणी साचून निर्माण होणारी परिसंस्था म्हणजेच ‘रॉक पूल्स’. यातील पाण्याच्या गुणवत्तेनुसार तेथील जैवविविधता बदलत असते. या अधिवासात अनेक प्रदेशनिष्ठ प्राणी व वनस्पतींच्या जाती आढळतात.

संशोधनातील महत्त्वाच्या बाबी

  • महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळ येथील ८० रॉक पूल्सचे सर्वेक्षण

  • पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याने प्रदेशनिष्ठ प्राणी व वनस्पतींना वाढण्यासाठी उपयुक्त

  • कोकणातील काही ‘रॉक पूल्स’मध्ये सल्फेट आणि मॅग्निशियमचे प्रमाण जास्त

  • पठाराच्या भागातील शेतांमध्ये वापरली जाणारी खते किंवा जवळच्या उद्योगांमुळे रॉक पूल्सच्या पाण्यावर परिणाम

संशोधनाचा फायदा

  • ‘रॉक पूल्स’च्या परिसंस्थेचा अभ्यास

  • यावर अवलंबून असलेल्या जैवविविधतेचे महत्त्व

  • पाण्याच्या रासायनशास्त्राच्या

  • अभ्यासातून जैवविविधतेला समजणे शक्य

रॉक पूल्सच्या पाण्याचा रसायनशास्त्रीय अभ्यास पहिल्यांदाच केला आहे. रॉक पूल्स ही पूर्णपणे वेगळी परिसंस्था असून याचा फारसा अभ्यास केला जात नाही. हे संशोधन भविष्यात केला जाणारा अभ्यास किंवा संशोधनासाठी पाया ठरेल.

- डॉ. कार्तिक बालासुब्रमनीयन, आघारकर संशोधन संस्था

आम्ही गेली काही वर्षे पठारावरील वनस्पतिजीवनाचा अभ्यास करत आहोत. नुकताच केलेला पठारावरील छोट्या तळ्यामधील पाण्याचा अभ्यास आम्हाला पठारावरील वनस्पती विविधतेची सद्यःस्थिती आणि त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

- डॉ. मंदार दातार, आघारकर संशोधन संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT