पुणे

कमवा आणि शिका’तून आकाराला आलेलं स्वप्न!

CD

शब्दांकुर लेख

‘कमवा आणि शिका’च्या शिकवणीतून आकाराला आलेलं स्वप्न

​माणसाचं नशीब त्याच्या जन्माने ठरत नसतं, तर मनगटातील जिद्द आणि घामाच्या थेंबांनी कोरलं जातं, याचा प्रत्यय मला माझ्या एका अत्यंत जवळच्या सहकाऱ्याच्या प्रवासाकडे पाहताना वारंवार येतो. फलटण तालुक्यातील राजुरीसारख्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज साताऱ्यातील नवउद्योजकतेचे एक आश्वासक उदाहरण बनून समोर आला आहे. कमी वयात जिद्दीने रोहित भोसले याने उभारी घेतली आहे.
​राजुरीतील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला रोहित गणपत भोसले. घरची परिस्थिती अगदीच बेताची; पण आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कधी अंतर पडू दिलं नाही. पुढील शिक्षणासाठी २०१० मध्ये तो साताऱ्यात आला. महाराजा सयाजीराव विद्यालय, शाहू बोर्डिंग आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी कॉलेजने त्याच्यावर केवळ शिक्षणाचेच नव्हे, तर स्वावलंबनाचे खरे संस्कार केले.
​महाविद्यालयीन काळात त्याने कर्मवीरांच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेत स्वतःला झोकून दिले. पहाटे गिरणीत जाऊन दळण दळणे, सुटीच्या दिवशी बागेत खुरपणी करणे आणि दररोजचे चार तास अनिवार्य श्रम... कोणताही संकोच न बाळगता त्याने हे काम केले. या दोन वर्षांच्या कष्टांनी त्याला केवळ दोन वेळचा डबा मिळवून दिला नाही, तर आयुष्याचा पाया पक्का केला. डॉ. रामराजे माने-देशमुख, डॉ. शरद ठोकळे आणि राहुल व्हराडे यांच्यासारख्या शिक्षकांचे मिळालेले प्रेमळ मार्गदर्शन त्याच्यातील आत्मविश्वास वाढवणारे ठरले.
​कॉलेजनंतर पोटापाण्यासाठी रोहितने साताऱ्यातील सुंदरबन हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली. टेबल पुसण्यापासून ते वेटर, कॅप्टन आणि थेट मॅनेजर पदापर्यंत मजल मारताना अनेक चांगले-वाईट अनुभव त्याच्या गाठीशी आले. काही कटू अनुभवांतून, अपमानातून त्याने एकच ध्यास घेतला, ‘आपणही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा; पण तिथे आपल्यासारख्या कष्टकरी मुलांना सन्मानाने काम द्यायचे.’’
​या धडपडीत त्याला भरत कदम यांच्यासारखे मार्गदर्शक भागीदार भेटले. भरत नानांनी रोहितला व्यवसायातील खाचाखोचा शिकवल्या आणि चुका सांभाळून घेत आधार दिला. रोहितच्या या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याने एकट्याने प्रगतीची वाट धरली नाही. ‘कमवा आणि शिका’मध्ये सोबत घाम गाळणाऱ्या परशुराम कांबळे, ऋषी तांबे, बाजी काळे आणि दत्ता तोडकर या सहकारी मित्रांना त्याने सोबत घेतले. हे सर्व मित्रही अगदी कमी वयाचे. या सर्वांना सोबत घेऊन त्यातूनच उभी राहिली ‘स्वावलंबी मॅनेजमेंट टीम’. आज सातारा, पाचवड, भुईंज आणि कास पठार अशा विविध ठिकाणी हॉटेल्सचे यशस्वी व्यवस्थापन ही तरुण मंडळी सांभाळत आहेत. सुरुवातीला सुंदरबन हॉटेलचे मॅनेजमेंट सांभाळताना आलेला अनुभव पुढे पाच हॉटेलचे मॅनेजमेंट सांभाळण्यापर्यंत उपयोगी आला. प्रत्येक जण आपापली जबाबदारी अत्यंत बारकाईने सांभाळत आहेत.
गोदावरी, सोनचाफा, गुलमोहर, झा झेन, इंगळे पेढा हाऊस या ​हॉटेल व्यवसायासोबतच आसमानी ट्रेकर्स, गड-किल्ले संवर्धन आणि ट्रॅव्हल्स अशा अनेक क्षेत्रांत ही टीम कार्यरत आहे. आज त्यांच्या या प्रयत्नांमुळे तब्बल १३० ते १४० कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरळीत चालतो आहे, ही गोष्ट केवळ अभिमानास्पदच नाही, तर कौतुकास्पद आहे. ​वयाच्या अवघ्या पंचविशीत उभा राहिलेला हा डोलारा दाखवून देतो, की स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास असेल आणि सोबत प्रामाणिक मित्रांची साथ असेल, तर संघर्षाच्या काटेरी वाटेवरही यशाची सुंदर फुलं फुलवता येतात. स्वतः मोठं होण्यापेक्षा आपल्या माणसांना सोबत घेऊन मोठं होण्यातच खऱ्या यशाचा आनंद सामावलेला असतो.

- भोलेनाथ केवटे, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भगवंत मान यांना व्हिसा देण्यास पाकिस्तान तयार; पण भारत सरकार परवानगी देणार का?

IND vs NZ 2nd ODI Live : धो धो पाऊस सुरू झाला... भारताच्या झाल्यात ७ बाद ११३ धावा; सामना आता रद्द झाला तर जिंकणार कोण?

Sakal Lit Fest 2026: ‘सकाळ लिट फेस्ट’ १२ नोव्हेंबरपासून;बुकर विजेत्या बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्‍घाटन

''अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं पाहिजे होतं'', आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप

Mumbai News: सरकारला न्यायालयाचा दणका, खासगी प्रकल्पासाठी 'टाटा'च्या जमीन संपादनाचा निर्णय रद्द

SCROLL FOR NEXT