Rohit Pawar
Rohit Pawar 
पुणे

RBI ने दिलेले 99 हजार कोटी लसीकरणासाठी वापरा; रोहित पवार

शरयू काकडे

पुणे : ''देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि RBI कडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील, असे ट्विट करुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकाराला सल्ला दिला आहे. (Rohit Pawar Tweeted Central government should Use Rs 99000 crore provided by RBI for vaccination)

कोरोना महासाथीच्या संकटात केंद्र सराकाराला मदत करण्यासाठी RBIने मोठा निर्णय घेतल आहे. RBI ने आपल्या खजिन्यातील 99122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्रसरकारकडे वर्ग करणार आहे. आर्थिक वर्ष 2020-21च्या जुलै ते मार्चच्या 9 महिन्यांची ही अतिरिक्त रक्कम असणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फसरिंगद्वारे ही बैठक पार पडली.

दरम्यान, सध्या कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या आर्थिक नियोजनाबाबात आमदार रोहित पवार आज ट्विट केले आहे. देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज RBI कडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये वापरावे असे केंद्र सरकारला सुचविले आहे. तसेच' 'राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि GST मध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं.असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू!” असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. केंद्र सरकारला दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT