Roll Ball Sakal
पुणे

Roll Ball : पुण्यातील शिक्षकाने विकसित केलेला‘रोल बॉल’ खेळ

पुण्यातील क्रीडाशिक्षक राजू दाभाडे यांनी वीस वर्षांपूर्वी विकसित केलेला ‘रोल बॉल’ हा आगळावेगळा खेळ आज सुमारे पंचावन्न देशांमध्ये खेळला जातो आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील क्रीडाशिक्षक राजू दाभाडे यांनी वीस वर्षांपूर्वी विकसित केलेला ‘रोल बॉल’ हा आगळावेगळा खेळ आज सुमारे पंचावन्न देशांमध्ये खेळला जातो आहे.

पुण्यातील क्रीडाशिक्षक राजू दाभाडे यांनी वीस वर्षांपूर्वी विकसित केलेला ‘रोल बॉल’ हा आगळावेगळा खेळ आज सुमारे पंचावन्न देशांमध्ये खेळला जातो आहे. याच्या शालेय, विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांना खेळाडू विद्यार्थी व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. स्वामित्व अधिकार कायदा अंतर्गत दाभाडे यांच्या नावे या खेळाची नोंद केली आहे.

दाभाडे म्हणाले, ‘वीस बाय चाळीस मीटर जागेत हा खेळ खेळला जातो. ती जागा भुसभुशीत नसते. सिमेंट, फरशी किंवा लाकडाची जागा यासाठी लागते, कारण पायांना स्केट लावून चेंडूच्या साहाय्याने हा खेळ रंगतो. दोन संघांमध्ये सामना होतो. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. पैकी सहाच फक्त खेळात उतरलेले असतात. स्केटिंग करत चेंडू पायाने पुढे नेत प्रतिस्पर्धी संघाच्या गोल पोस्टमध्येतो धाडून गोल नोंदवायचा असतो. संघातील इतर सहा खेळाडू रांगेत असतात. त्यांच्यापैकी स्वतःची पाळी आल्यावर ते क्रमाने येतात. या खेळात बाद होणे तसेच पेनल्टी वगैरे नियम आहेत.’

दाभाडे यांनी असेही सांगितले की, क्रीडाशिक्षक या नात्याने विद्यार्थी खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी नवनवीन खेळ शोधले जायला हवेत. या उद्देशाने मी हा खेळ विकसित केला. यात चपळपणा, एकाग्रता, सांघिक भावना, आयत्या वेळी योग्य निर्णय आदी गुणांचा कस लागतो. बास्केटबॉल, हॉकी वगैरे खेळांच्या जवळ जाणारा हा खेळ आहे. स्केटिंग करत चेंडू लाथाडत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये चेंडू तटवून गोल करणे, हे आव्हान यात असते. समजा चेंडू गोलपोस्टमध्ये गेला, परंतु तो करणाऱ्याचा स्पर्श नियंत्रणरेषेला झाला तर तो गोल धरला न जाता फाउल ठरतो.

वीस वर्षांपूर्वी मी ही संकल्पना ‘स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ समोर मांडली. त्यांचे संचालक व प्रकल्प अधिकारी पुण्यात येऊन चाचणी खेळ पाहून गेले. त्यांना तो आवडला. मात्र, त्यांनी काही सूचनाही केल्या. त्या समाविष्ट करून मी हा खेळ विकसित केला. त्याला केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाने मान्यता दिली. याच्या स्पर्धा विविध स्तरांवर होत हा खेळ अनेक देशांमध्ये पोहोचला. सध्या सुमारे पंचावन्न देशांमध्ये हा खेळला जातो आहे. ‘इंटरनॅशनल रोल बॉल फेडरेशन’ची स्थापना मी केली. संबंधित कार्यालय पुण्यातच आहे. या माध्यमातून आतापर्यंत या खेळाच्या जागतिक पातळीवरील पाच स्पर्धा घेतल्या गेल्या असून सहाव्या स्पर्धेचे नियोजन सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT