pahaddara 
पुणे

पुणे झेडपीच्या कामाचा दर्जा एकाच पावसात उघड्यावर

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथे शनिवारी (ता. 5) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नव्याने बसवलेले पत्र्याचे छत कोलमडून पडले आहे. दिड महिन्यापूर्वीच छत बसवले होते.

पहाडदरा येथील प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीला दिड महिन्यापूर्वीच जिल्हा परिषदेने नव्याने पत्र्याचे छत बसवले होते. संबधित ठेकेदाराने शाळेच्या पुढील व्हरांड्याचे जुने लाकडी खांब तसेच ठेऊन त्यावर पत्रे बसवले होते. शनिवारी झालेल्या वादळी पावसाने शाळेचे पुढील बाजूचे छत कोलमडून पडले आहे. 

याबाबत सरपंच राजश्री संतोष कुरकुटे यांनी सांगितले की, संबधित ठेकेदाराने नविन पत्रे टाकताना जुने खांब बदलून नविन लोखंडी खांब बसवणे गरजेचे होते, परंतु जुनेच खांब वापरले. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यातच छत कोसळले. जिल्हा परिषदेने संबधित ठेकेदाराकडून हे छत त्वरीत दुरुस्त करुन घ्यावे. कोरोनोमुळे शाळा बंद असल्याने कोणासही दुखापत झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT