PNE26W57570
सोलापूर : रूपाभवानी मंदिरात महिलांची तपासणी करताना डॉक्टर.
---
महिला देवीभक्तांसाठी भव्य आरोग्य शिबिर
विविध संस्थांच्या पुढाकाराने रूपाभवानी मंदिरात आयोजन
सोलापूर, ता. १२ : नवरात्रोत्सवानिमित्त श्री रूपाभवानी देवस्थान येथे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने आणि श्री रूपाभवानी मंदिर समिती ट्रस्टचे अध्यक्ष मल्लिनाथ मसरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
या वेळी रोटरीचे अध्यक्ष नीतेश पंचमिया, डी. एस. मुंदडा, पोलिस निरीक्षक सचिन यादव, विश्व हिंदू महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर झंवर, उपाध्यक्ष सुयश खानापुरे, सचिव महेश जिंदम, संघटना महामंत्री सतीश आनंदकर, डॉ. एन. बी. तेली, गीतगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष व्यंकटेश कंची, पश्चिम महाराष्ट्र जिज्ञासा प्रांत संयोजक डॉ. रजनी गायकवाड, निमाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी, निमा वूमन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे, यश डेव्हलपर्सचे सुयश खानापुरे, सोनाली खानापुरे, आकाश गायकवाड आणि हेडगेवार रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी रवी कोटा आदी उपस्थित होते.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर अध्यक्षस्थानी होते. व्यंकटेश कंची यांनी स्वागत केले. निमाचे शहराध्यक्ष डॉ. जिड्डीमनी यांनी प्रास्ताविक केले. सुगतरत्न गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. श्रुती मराठे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.