‘ज्ञानदीप’चा रोशन राज्यपातळीवर तृतीय
अमरावतीतील बालवैज्ञानिक प्रदर्शनात यश; ज्येष्ठांसाठी ‘मल्टीपर्पज स्टिक’
वाई, ता. १५ : पसरणी (ता. वाई) येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी रोशन ज्ञानदेव वाशिवले याने ५३ व्या राज्य बालवैज्ञानिक प्रदर्शनात राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.
नागपूर येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचलित विज्ञान महाविद्यालय येथे बालवैज्ञानिक प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनात त्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (नववी ते बारावी सर्वसाधारण) विभागात हे यश मिळवले. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून निवड झालेल्या १११ उत्कृष्ट उपकरणांमधून रोशनच्या ‘स्मार्ट मल्टीपर्पज स्टिक ऑफ एल्डर पीपल’ या उपकरणाने विशेष स्थान मिळवत राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला. वृद्धांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे उपकरण असल्याने परीक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले. त्याला लीना जाधव यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच पालक ज्ञानदेव वाशिवले व प्रा. सरस्वती वाशिवले यांचे सहकार्य लाभले.
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचे संचालक डॉ. राजकुमार अवसरे, प्राचार्य हर्षलता बुराडे आदी मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, श्री. गिरी, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर, जिल्हा समन्वयक अंबादास भंडारे, लक्ष्मण उबाळे, नितीन देसाई, श्री. अपराध, ज्ञानदीप स्कूलच्या प्राचार्या शुभांगी पवार आदींनी त्याचे अभिनंदन केले. रोशनची बहीण सज्ञा वाशिवले हिनेही दिल्ली येथील इन्स्पायर अवॉर्डमध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तिला जपान येथे अभ्यास दौऱ्याची संधी मिळाली होती.
------------------------------------
छायाचित्र :...........07582
नागपूर : राज्य बालवैज्ञानिक प्रदर्शनात राज्यपातळीवर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते स्वीकारताना रोशन वाशिवले. त्या वेळी पालक ज्ञानदेव वाशिवले, सरस्वती वाशिवले व इतर मान्यवर.
........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.