पुणे

नेशन बिल्डर सन्मान पुरस्कार वितरण

CD

PNE26W57108
सोलापूर ः पुरस्कारर्थीसह रोटरी क्लब ऑफ ईस्ट सोलापूरचे पदाधिकारी.

सहा शिक्षकांना ‘नेशन बिल्डर ॲवॉर्ड’
रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टचा उपक्रम; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टतर्फे ‘नेशन बिल्डर ॲवॉर्ड २०२६’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात झाला. यावेळी सहा गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. संतोष कदम, प्रा. डॉ. आनंदराव काशीद, अंबादास रेडे, संजय जवंजाळ, प्रा. कोमल कोंडा व शाहिस्ता नाज महीबूब करजगी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, शिक्षण प्रशासन अधिकारी मल्हारी माने व रोटरीच्या सहायक प्रांतपाल वंदना कोपकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये आणि संस्कार रुजवून जबाबदार नागरिक घडवितात, असे डॉ. जयकर यांनी सांगितले. या पुरस्कारांमुळे शिक्षकांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, असे मल्हारी माने यांनी नमूद केले.
क्लबचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भाग्यश्री राठोड यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव ज्ञानेश्वर जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी क्लबचे पदाधिकारी वैभव होमकर, सचिन जोशी, डॉ. श्रीकांत जोशी, रंजना शिरसाठ, प्रवदा देशपांडे, ॲड. ऋतुराज निलेगावकर, मल्लिकार्जुन पाटील, राहुल जाधव आणि लक्ष्मी बिराजदार यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT