पुणे

रूटमॅटिकची कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’आधारित शटल सेवा

CD

रूटमॅटिकची कर्मचाऱ्यांसाठी
‘एआय’आधारित शटल सेवा

पुणे, ता. १२ : पुणे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जागतिक स्तरावरील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर ठरले आहे. वाहतूककोंडीसह हिंजवडीतील वाढत्या प्रवासाच्या आव्हानांवर मात करण्याच्या उद्देशाने रूटमॅटिक या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॉर्पोरेट मोबिलिटी क्षेत्रातील कंपनीने ‘कोको राईड्स’ ही कर्मचाऱ्यांसाठीची पहिली ‘ॲप-आधारित शटल सेवा’ सुरू केली आहे.
हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए) यांच्या भागीदारीत, शिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा ८० हून अधिक कंपन्यांमधील १.२५ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुब्रमण्यम राधाकृष्णन, रूटमॅटिकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कन्नन, रूटमॅटिकच्या सह-संस्थापक व कार्यकारी संचालिका कविता रामचंद्रगौडा यांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीच्या टप्प्यात ८० हून अधिक बसेस ७० हून अधिक मार्गांवर सेवा देणार असून, दैनंदिन प्रवासी क्षमता २० हजारांपर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT