पुणे

रॉयल फ्रेंड्स चे दातृत्व

CD

गरजू विद्यार्थ्यांना रॉयल फ्रेंड्सने घेतले दत्तक

दहावीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी; उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक


गोंदवले, ता. १४ : माण तालुक्यातील किरकसाल येथील रॉयल फ्रेंड्स ग्रुपने गावातील गरजू पाच विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. ग्रुपच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला असून, परिसरात या कार्याचे कौतुक होत आहे.

यंदा वर्धापनदिनानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने किरकसाल माध्यमिक विद्यालयातील पाच गरजू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सहावीतील श्रेया मधुकर कचरे, प्राची नितीन लोखंडे, सानू संतोष कुंभार तसेच आठवीतील राज अधिक काटकर आणि नवनाथ सुखदेव चव्हाण या विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंतचा संपूर्ण शैक्षणिक खर्च रॉयल फ्रेंड्स ग्रुप उचलणार आहे.

ग्रुपच्या सदस्यांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊ वाटप करण्यात आले. शिंदेनगर अंगणवाडीसाठी कुकर भेट देण्यात आला, तसेच कत्तलखान्यातून वाचवलेल्या गायींना चारा देऊन गोसेवेद्वारे पर्यावरण व पशुधनाबद्दलची जाणीवही व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास माजी सरपंच अमोल काटकर, पोलिस पाटील दत्तात्रय रसाळ, मुख्याध्यापक माणिकराव सोनवलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध सामाजिक उपक्रम
रॉयल फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गावातील पारंपरिक यात्रा व उत्सवांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करणे, दहिवडी येथील दिव्यांग शाळेला सहकार्य करणे तसेच गावातील रस्त्यांचे मुरमीकरण करून डागडुजी करण्याचे कामही ग्रुपने केले आहे.


02592
किरकसाल : रॉयल फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांसह विद्यार्थी. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT