Crime esakal
पुणे

Pune Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; पसार झालेला आरपीएफमधील हवालदार अटकेत

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हवालदार दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होता.

अनिल पवार असे अटक करण्यात आलेल्या लोहमार्ग पोलिस दलातील हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश), सुश्मिता कसबे आणि करण राठोड यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पवार याने ताडीवाला रस्त्यावरील रेल्वेच्या जागेत बेकायदा सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी सुरू केली होती. परगावावरून रेल्वे स्थानकात पळून आलेल्या फिर्यादी मुलीला व तिच्या प्रियकराला हेरून पवार आणि त्याचे साथीदार सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीत घेऊन गेले होते. तेथे आरोपींनी दोघांना धमकावून पैसे उकळले. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. मुलगी आणि तिचा प्रियकर मूळचे छत्तीसगडमधील आहेत.

ते दोघे छत्तीसगडमधून पसार झाले. त्यामुळे मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार छत्तीसगडमधील स्थानिक पोलिस ठाण्यात दिली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी व तिच्या प्रियकर आरोपींना पुणे रेल्वे स्थानकात आढळून आले होते.

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार फरार झाला होता. लोहमार्ग पोलिस त्याच्या मागावर होते. तो पुण्यातील घरी येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून पवारला अटक केली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश देवीकर, पुणे रेल्वे स्थानक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT