पुणे

कोणी चिल्लर घेता का चिल्लर 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही चिल्लर कोणीच स्वीकारण्यास तयार नाही. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या सूचनांनुसार पीएमपी प्रशासन आणि सेंट्रल बॅंक यांची बैठक घेऊनही या प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही. या प्रश्‍नातून मार्ग काढण्याची खासदार अनिल शिरोळे यांची घोषणा हवेतच विरली आहे.

पीएमपीने डेपोस्तरावर ही चिल्लर ठेवली आहे. मात्र, तिलाही नागरिकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. चिल्लर पडून असल्याने त्याचा परिणाम पीएमपीच्या नियोजनावर होत आहे. ४ ऑक्‍टोबरपासून बॅंकेने ही चिल्लर घेण्यास नकार दिला होता. हा प्रश्‍न निकाली काढण्यात पीएमपी प्रशासन अपयशी ठरले आहे. पीएमपीच्या १३ आगारांची मिळून दररोज दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर जमा होते. 

हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आरबीआयने पीएमपी प्रशासन आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया यांच्यासमवेत चर्चा केली. त्या चर्चेमध्ये पीएमपी प्रशासनाने शक्‍य होईल, तेवढी चिल्लर स्वतः वापरामध्ये आणावी आणि कमीत कमी चिल्लर बॅंकेकडे जमा करावी, तसेच बॅंकेनेही शक्‍य होईल तेवढी चिल्लर घ्यावी, अशी अपेक्षा आरबीआयने व्यक्त केली. परिणामी, पीएमपी प्रशासनास जास्त चिल्लर वापरात आणावी लागणार आहे. 

बॅंकेने चिल्लर घ्यावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंबंधी आरबीआयच्या माध्यमातून बॅंकेबरोबर बैठकही घेण्यात आली आहे. या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तसेच पीएमपीच्या प्रत्येक डेपोवर ही चिल्लर ठेवण्यात आलेली आहे.
- सुभाष गायकवाड, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

पीएमपीचे १३ आगार 
दररोज दीड ते दोन लाखांची चिल्लर
एकूण २० लाख रुपये पडून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT