पुणे

जनगणना प्रक्रियेत संघाचे स्वयंसेवक

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १७ ःदेशात पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेसाठी प्रगणक नियुक्ती प्रक्रियेची व्याप्ती वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या निमित्ताने जनगणना प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांना घुसविण्याचा सरकारचा डाव असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला.
‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांनी सरकार आणि संघाला लक्ष्य केले. सरकारने शुक्रवारी (ता.१६) जारी करण्यात आलेल्या जनगणनेच्या अधिसूचनेचा संबंध बेळगाव येथे झालेल्या ‘आरएसएस’च्या प्रशिक्षण शिबिराशी जोडताना रमेश यांनी म्हटले की या शिबिरात ‘जनगणना २०२७’ हा प्रमुख विषय होता. जनगणनेसाठी गणना कर्मचारी म्हणून नियुक्त होऊ शकणाऱ्या व्यक्तींची व्याप्ती वाढविण्याच्या निर्णयामुळे ‘आरएसएस’ आणि भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गृह मंत्रालयाने २६ मे २०२६ रोजी लोकसंख्येतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचा उल्लेख करताना रमेश म्हणाले, की या समितीने १४ ऑक्टोबर रोजी देशातील लोकसंख्येतील बदलांसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह भारतीय आणि परदेशी संस्थांकडून सूचना मागविल्या आहेत. समितीच्या सदस्यांचे ‘आरएसएस’शी संबंधित संघटना आणि व्यक्तींशी संबंध आहे. जनगणनेच्या प्रक्रियेत यापूर्वीच हस्तक्षेप झाला असून नव्या निर्णयामुळे या प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची भीती आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या हेतूंवर रमेश यांनी प्रश्न उपस्थित केला.

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

FDA Action : मुदतबाह्य, खराब अन्नपदार्थांच्या साठ्याची विल्हेवाट संशयास्पद; रिलायन्स रिटेल, ब्लिंकिटला ‘एफडीए’चा दणका

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, सव्वा नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Beed News : बीडमध्ये महायुतीच्या सभेत भाजपच्या दोन आमदारांची दांडी; पंकजाताईंच्या टोमण्याने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT