RTE admission registration process starts heck last date and process here  
पुणे

RTE Admission : राज्यात आरटीईसाठी सर्वाधिक अर्ज पुण्यातून; राज्यात थंड प्रतिसाद

RTE Admission Process Starts : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सम्राट कदम

पुणे : आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी पुणे जिल्हा आघाडीवर असून, बुधवारी सायंकाळ पर्यंत दोन हजार २९६ अर्ज दाखल झाले होते. राज्यात हीच संख्या सात हजार ४१६ एवढी होती. बहुतांश जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरण्यास थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. काही जिल्ह्यात बोटावर मोजण्या एवढे अर्ज भरले गेले आहेत.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील ७६ हजार ३६ शाळांमधील आठ लाख ८६ हजार १५९ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यातील बहुतांश शाळा या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत. त्यामुळे किती पालक प्रवेशास पसंती देतात, याबाबतचे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मंगळवारपासून (ता.१६) अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

सरकारी शाळेत प्रवेशासाठी आरटीईचा घाट कशाला

पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरत असताना केवळ सरकारी व अनुदानित शाळांची यादी समोर येत आहे. त्यामुळे पालकांची घोर निराशा झाली आहे. सरकारी शाळेत प्रवेश घ्यायचा मग आरटीईचा अर्ज कशाला करायचा? अर्ज न भरता सुद्धा शाळेत थेट प्रवेश मिळतोच ना? मग एवढा खटाटोप कशासाठी ? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. आपल्या मुलाला सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने पालक आरटीईतून प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होते.

आरटीई प्रवेशाची स्थिती

तपशील : राज्यातील स्थिती ः पुणे ः नगर ः नाशिक ः सोलापूर

आरटीई शाळा ः ७६०४६ ः ५१९९ ः ४०५७ ः ४०१४ ः ३३९३

प्रवेशाच्या जागा ः ८,८६,२३९ ः ७३०७८ ः ४८२२४ ः ५३४०४ ः ३९४४७

आलेले अर्ज ः ७,४१६ ः २२९६ ः २६६ ः ५३४ ः १३९

------------

संकेतस्थळ ः https://student.maharashtra.gov.in/adm_portal

अंतिम मुदत ः ३० एप्रिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT