RTE website is closed School wise lists of RTE admissions announced sakal
पुणे

आरटीई प्रवेशाच्या शाळानिहाय याद्या जाहीर

आरटीई संकेतस्थळ बंद असल्याने पालकांमध्ये गोंधळ

- मीनाक्षी गुरव

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी काढलेल्या ऑनलाइन सोडती निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शाळानिहाय याद्या सोमवारी सायंकाळी उशिरा प्रसिद्ध करण्यात आल्या. दरम्यान, आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ दिवसभर बंद असल्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पालकांचा चांगलाच गोंधळ उडाला. सायंकाळी उशिरा प्रवेशाचे संकेतस्थळ पूर्ववत झाले.

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२-२३ साठी शाळानिहाय आरक्षण ऑनलाइन सोडत मागील आठवड्यात काढण्यात आली. या सोडतीनुसार विद्यार्थ्यांची शाळानिहाय याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रवेशाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाची माहिती उपलब्ध होईल. प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज करताना नोंदविलेल्या मोबाईलवर मंगळवारपासून (ता.५) एसएमएस येतील. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी. सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘ॲलाॅटमेट लेटर’ची प्रिंट काढावी आणि पुढील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

प्रवेशासाठी १९ एप्रिलपर्यंत मुदत

‘‘प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी १९ एप्रिलपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करायचा आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या ॲलाॅटमेंट लेटरवर सविस्तर सूचना दिल्या आहेत, त्याप्रमाणे पालकांनी कार्यवाही करावी. आवश्यकता वाटल्यास प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येईल. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या संकेतस्थळावर अपडेट करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे सोमवारी काही वेळ संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले होते.’’

- दिनकर टेमकर, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

  • आरटीई २५ टक्के राखीव जागा लागू होणाऱ्या शाळांची संख्या : ९,०८६

  • रिक्त जागा : १,०१,९०९

  • एकूण आलेले अर्ज : २,८२,७८३

  • सोडतीत निवड झालेले विद्यार्थी : ९०, ६८८

  • प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी : ६९,८५९

‘‘आरटीई शाळा प्रवेशासाठी यंदा दोन लाख ८२हजार पेक्षा जास्त अर्ज करण्यात आले आहेत. आज दुपारपासून लाखो पालक शाळा प्रवेशाच्या निवडीच्या एसएमएसची वाटत पाहत होते. परंतु दुपारपासून संकेतस्थळ बंद होती आणि त्यावर ‘साईट अंडर मेंटेनन्स’ असे दिसत होते. दरवर्षी संकेतस्थळ वेळेत सुरू न झाल्याने, मेसेज न आल्याने पालकांना मनस्ताप होत आहे.’’

- मुकुंद किर्दत, आप पालक युनियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT