पुणे

माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांचे प्रभावी शस्त्र

CD

चिंचवड, ता. १२ : ‘‘सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक पाहता ही खरोखर जनतेची सत्ता आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. ही व्यवस्था बदलण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ हे सर्वसामान्यांच्या हातातील प्रभावी शस्त्र आहे, असे प्रतिपादन ॲड. अजित बोराडे यांनी केले.
दक्ष नागरिक संघाच्यावतीने चिंचवड येथे आयोजित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा महामेळावा व पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. यावेळी संजीवन सांगळे, ज्ञानेश्वर नागरगोजे, शांताराम कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते अनेकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ॲड.बोराडे म्हणाले, माहिती अधिकार कायद्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढते आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर प्रकाश पडतो. या कायद्यांतर्गत नागरिकांना सरकारी कामातील साहित्याचे नमुने घेण्याचा तसेच प्रत्यक्ष फाईल तपासणी करण्याचाही अधिकार आहे.’’
खासदार बारणे यांनीही विचार मांडले. ॲड.श्वेता मांडे-वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. विनोद क्षीरसागर यांनी प्रास्ताविक तर नीलेश हाके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! नीट २०२६ परीक्षा रद्द, पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होणार

Mumbai : नालेसफाईच्या पाहणीसाठी २५ गाड्यांचा ताफा, भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा दौरा

Hapus Mango Price Drop: आंबा प्रेमींसाठी खुशखबर! हापूसच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या नवे दर

बाबासाहेबांचे मुद्रणालय पाडणे धक्कादायक! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे, प्रतिज्ञापत्र अस्वस्थ करणारे

Kolhapur Ajra 2 Drowning Death : सासऱ्यांचा निवृत्ती कार्यक्रम करून घरी जाताना मामा भाच्याचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू, कोल्हापुरातील आजऱ्यातील घटना

SCROLL FOR NEXT