लोगो : सकाळ इम्पॅक्ट
आरटीओ कार्यालय परिसर टपरीमुक्त
दिव्यांगांसाठीच्या राखीव क्षेत्रातील अतिक्रमणे हटली; ज्येष्ठांसह महिलांना दिलासा
सातारा, ता. २६ : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयानजीक सिगारेट ओढणाऱ्यांचा अड्डा झाला होता. या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या गर्दीमुळे आणि धूम्रपानामुळे तिथून ये- जा करणाऱ्या नागरिकांना, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या या क्षेत्रात अनधिकृत टपऱ्या वाढल्या होत्या. या सर्व अनधिकृत टपरीधारकांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देताच दोन दिवसांत संपूर्ण परिसर टपरीमुक्त झाला आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस पालिकेने दिव्यांग यांना व्यवसाय करता यावा, यासाठी क्षेत्र राखीव ठेवले आहे. या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींनी छोटे छोटे व्यवसाय थाटले आहेत. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे. याच परिसरात काहींनी अनधिकृतरीत्या टपरी टाकत चहापासून खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, गाड्या थाटल्या. यामुळे
आरटीओ चौकात दिवसा आणि रात्री चहाबरोबर सिगारेट ओढण्यासाठी युवा वर्गाची गर्दी होत होती. त्यातून रात्रीच्या वेळेस वादावादी, भांडण, मारामाऱ्या असे प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबरोबरच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने लागायची. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ही समस्या दिवसेंदिवस गंभीर आणि त्रासदायक होऊ लागली होती.
पालिकेने दिव्यांग क्षेत्रातील अनधिकृत टपऱ्या, पानटपऱ्या, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना समज देत तातडीने अतिक्रमणे काढण्याची सूचना केली. त्यास प्रतिसाद देत काहींनी तातडीने टपऱ्या हटविल्या, तर काहींनी सोमवारपर्यंत (ता. २९) मुदत मागितली. दरम्यान, कारवाईचा इशारा देताच अनधिकृत टपऱ्या, हातगाडे, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या हटविण्याची लगबग परिसरात सुरू असल्याचे दिसून आले.
PNE26W29960 आणि PNE26W29971
सातारा : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयानजीक अतिक्रमित भाग काढताना विक्रेते. दुसऱ्या छायाचित्रात पालिकेच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर टपरीमुक्त झालेला परिसर. (प्रमोद इंगळे-ः सकाळ छायाचित्रसेवा)
.......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.