(लोगो - सकाळ इम्पॅक्ट)
आरटीओ कार्यालयात रिक्षा पासिंग सुरू करा
कऱ्हाडला ‘प्रियदर्शनी’तर्फे निवेदन; जुन्या, विनापरमिटवर कारवाईची मागणी
कऱ्हाड, ता. २९ ः येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काही दिवसांपासून रिक्षा पासिंग बंद आहे. स्वयंचलित फिटनेस सेंटर बंद असल्याने शेकडो रिक्षा विनापासिंग थांबून असून, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसमोर संकट उभे आहे. त्याविरोधात प्रियदर्शनी कऱ्हाड तालुका रिक्षाचालक-मालक संघटनेचे संस्थापक अशोकराव पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने पासिंग सुरू करण्याची मागणी केली, अन्यथा त्या विरोधात आंदोलनाचाही इशारा दिला.
निवेदनात म्हटले, की रिक्षांचे पासिंग बंद असल्यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसत आहे. आरटीओ कार्यालयात त्वरित पासिंग सुरू करावे. पासिंगचे ठप्प असल्याने अनेक रिक्षांचे काम रखडले आहे, ज्यामुळे चालकांचे नुकसान होत आहे. रिक्षा पासिंग नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पासिंग वेळेत होणे गरजेचे असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्यास जीवितहानी व नुकसान होऊ शकते. रिक्षाचालकांना जिल्हा परमिट आणि इरादा पत्र द्यावे. रिक्षाचालकांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जिल्हा परमिट द्यावे. त्यासह थोडेफार इरादा पत्र म्हणजे कच्चे परमिट द्यावे. त्यांचे नूतनीकरण करून मिळावे. तालुक्यातील अवैध, विना-कागदपत्रे रिक्षांवर कारवाई करावी. त्यासाठी १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या रिक्षा आणि त्याहून जुन्या स्क्रॅप रिक्षा, ज्या गाड्यांचे पासिंग, इन्श्युरन्स किंवा पीयूसी सर्टिफिकेट नाही आणि ज्या काही चालकांकडे परवाना, बॅच नाही, अशा नियमबाह्य रिक्षा व चालकांवर कठोर कारवाई करावी.
W62516
विजयनगर ः उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मागण्यांचे निवेदन देताना अशोकराव पाटील, रिक्षाचालक, मालक.
..................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.