RTPCR test  Sakal
पुणे

पावसाळी आजारांच्या निदानासाठी RT-PCR टेस्ट कीट

पावसाळी आजारांचे वेळेत निदान न झाल्यामुळे उचाराअभावी जगभरात अनेकांना प्राण गमवावे लागतात.

सकाळ वृत्तसेवा

पावसाळी आजारांचे वेळेत निदान न झाल्यामुळे उचाराअभावी जगभरात अनेकांना प्राण गमवावे लागतात.

पुणे - पावसाळी आजारांचे वेळेत निदान न झाल्यामुळे उचाराअभावी जगभरात अनेकांना प्राण गमवावे लागतात. अशा संसर्गजन्य आजारांच्या तातडीच्या निदानसाठी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने एक मल्टीप्लेक्स आरटी पीसीआर निदान कीट बाजारात आणले आहे. गुरूवारी पुण्यात मायलॅबने एक्सटेंडेड मान्सून फिव्हर पॅनलच्या लॉन्चची घोषणा केली.

हिवताप, चिकनगुनिया, डेंग्यू, झिका, लेप्टोस्पायरसीस आणि सालमोनेलोसिसजीवाणू प्रजाती तसेच लेईशमॅनीअसीस परजीवी यांचे नेमके निदान एक्सटेंडेड मान्सून फिव्हर पॅनलमुळे शक्य होते. संयुक्त टेस्ट किट अतिशय अचूक, वापरण्यास सोयिस्कर, आटोपशीर असून नमुन्यातील आजाराचा शोध अवघ्या दोन तासांत करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग शक्य आहे. मायलॅबचे संस्थापक हसमुख रावळ म्हणाले, “डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरीया, झिका, लेप्टोस्पायरसीस, सॅलमोनेलॉसीस इत्यादी रोगाणूजन्य किंवा साथीच्या आजारांचा मुख्य धोका भारताला आहे. कारण अचूक आणि विश्वासार्ह निदान पद्धतींच्या कमतरतेमुळे अशा अनेक आजारांचे अचूक निदान हे महत्त्वपूर्ण आव्हान ठरते. एक्सटेंडेड मान्सून फिव्हर पॅनल उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळे आम्ही मोसमी साथीच्या आजार निदानात आमूलाग्र बदल आणला आहे.

अचूकता आणि निदान वेगामुळे या उत्पादनाची कार्यक्षमता सिद्ध झाल्याने आजारांना कारणीभूत असणारे घटक पडताळण्यासाठी, आजारांचे व्यवस्थापन करण्याकरिता ही पद्धत अतिशय लाभदायक आहे. आरटी-पीसीआर निदान चाचणी विषयी सांगताना प्रयोगशाळेच्या संचालक सुक्ष्मजीवशास्रज्ञ डॉ. सुमेधा चौधरी म्हणाल्या, “कोविड-19 परिस्थितीत सुनिश्चित वेळेत संसर्गजन्य आजारांचे परीक्षण करणारी पीसीआर सुवर्ण मानक ठरली आहे. अगदी सुरुवातीला आणि अचूक निदानाकरिता एक्सटेंडेड मान्सून फिव्हर पॅनल सर्वप्रकारच्या पावसाळी आजारांचे अचूक निदान करण्यात लाभदायक आहे आणि उपचार योग्य पद्धतीने सुरू करण्यासाठी मदतीची ठरते.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT