सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १६ ः अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे पुढील आठवड्यात मुंबईत येत असून ते भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. मात्र ‘‘रुबियो यांच्या या दौऱ्यावरून इथले परराष्ट्र मंत्रालयाचे तुमचे अधिकारी संभ्रमात आहेत. काय चालले आहे? असा संभ्रम त्यांच्यात आहे. या पार्श्वभूमीवर मोदीजी काय सुरू आहे, ते तुम्ही समजावून सांगता की मी सांगू?’’ अशी उपरोधिक टिपणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली आहे.
रुबियो हे मुंबईत येत असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे तिथे येतील, अशी अपेक्षा असल्याचे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी अलीकडेच सांगितले होते. त्याचा संदर्भ देत गांधी यांनी वरील टिपणी केली आहे.रुबियो हे गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स कंपनीच्या कारखान्याला देखील भेट देणार आहेत. दरम्यान रुबियो हे भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे सर्जियो गोर यांनी सांगितले. पण जयशंकर हे तेथे येण्याची अपेक्षा असल्याचे त्यांचे विधान धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे.
‘‘भारताचे परराष्ट्र मंत्री ज्या लोकांना भेटतात, बैठका घेतात, त्याची घोषणा करण्याचे काम परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते करतात. आता हे काम अन्य कोणाला सोपवण्यात आले आहे काय?’’ असा टोमणा रमेश यांनी लगावला. तर, ऑपरेशन सिंदूर थांबले असल्याची माहिती देशाला दहा मे २०२५ रोजी रुबियो यांच्याकडूनच समजली होती. त्याचा संदर्भ देत रुबियो यांच्यासोबतच्या जयशंकर यांच्या भेटीच्या अनुषंगाने परराष्ट्र मंत्रालय गप्प का आहे? अशी विचारणाही रमेश यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.