पुणे

रुणवाल पार्क सोसायटी होतेय समस्यांचे आगार 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे. महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पीएमपी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील सुमारे दोन हजार रहिवाशांना राहणे अशक्‍य झाले आहे. 

गुलटेकडी मार्केट यार्ड पीएमपी बस डेपोच्या वर्कशॉपमधून ड्रेनेज लाइनमध्ये होणारी मातीमिश्रित काळ्या तेलाची गळती, त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांपासून सातत्याने तुंबणारी ड्रेनेज लाइन, पाठीमागील नाल्यांमध्ये टाकलेल्या सिमेंटच्या वाहिन्या या राडारोडा, थर्माकोल यामुळे पूर्णपणे तुंबल्या असून, भरीस भर म्हणून की काय, भर नाल्यातच भंगार व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून अरुंद केलेला नाला, त्यामुळे डुकरांनी मांडलेला उच्छाद आणि निर्माण होणारी दुर्गंधी, अशा परिस्थितीत नागरिकांना जीवन कंठावे लागत आहे. 

1971 पासून वसलेली गवळ्याची वाडी या झोपडपट्टीवासीयांचे 1996 मध्ये न्यू स्नेहनगर येथे पुनर्वसन करून उर्वरित जागेमध्ये हे गृहसंकुल उभे राहिले. रुणवाल गृहसंकुलामध्ये सात इमारतींमध्ये 154 सदनिका आहेत. प्रकाश घोणे आणि ज्ञानेश्‍वर भरेकर हे अनुक्रमे विद्यमान अध्यक्ष आणि सचिव आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डजवळ हे संकुल असल्याने व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर राहतात. वाहतुकीची वर्दळ असते. तशी जागा एकदम मोक्‍याची मात्र आता रहिवाशांनाच तेथे राहणे नको नकोसे होत आहे. 

याबाबत माहिती देताना संस्थेचे माजी सचिव अनिल मेमाणे म्हणाले, गेल्या दहा-बारा वर्षांपासून आम्ही त्रस्त आहोत. शेजारच्या पीएमपी डेपो आणि आमच्या सोसायटीची ड्रेनेज लाइन एक आहे. त्यांच्या वर्कशॉपचे काळे तेल आणि मातीमिश्रित पाणी या लाइनमध्ये येते. परिणामी ड्रेनेज तुंबते. तशातच थेट नाल्यातच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्यामुळे प्रवाहाला अडथळा येऊन ते पाणीदेखील चेंबरवाटे उलट सोसायटीच्या पार्किंगमध्ये घुसते. पावसाळ्यात तर सोसायटीत गुडघाभर पाणी असते. गेल्या दहा वर्षांपासून हे हाल सुरू आहेत. पीएमपीचे अधिकारी, महापालिका कोठी, क्षेत्रीय कार्यालयांकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. यंदा दसऱ्यापूर्वी, तब्बल दहा हजार रुपये खर्चून गाळ काढला. 

"आता मी हातात खराटा घेऊ का?' 
पीएमटी वर्कशॉपकडून येणाऱ्या काळ्या तेलाबद्दल डेपो मॅनेजर शितोळे यांना वारंवार विनंती केली; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. ते महापालिकेकडे बोट दाखवतात. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक कांबळे यांच्याकडे तक्रार केली, तर ते म्हणतात, हे काम आमचे नाही. कोणाचे आहे तेदेखील सांगत नाही. थोडाही पाठपुरावा केला तर फोनच उचलत नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा शितोळे यांच्याकडे तक्रार केली, तर ते म्हणतात, आता मी हातात खराटा घेऊ का?', अशी उत्तरे मिळणार असतील तर दाद मागायची तरी कोणाकडे, अशी कैफियत मेमाणे यांनी मांडली. 

नाल्यातील अतिक्रमणांबाबत महापालिका कोणतीही कारवाई करत नाही. पावसाळ्यात मोठी दुर्घटना होऊ शकते. यापूर्वी 8-10 वर्षांपूर्वी याच परिसरातील, लष्कर हद्दीतील सीमाभिंत फुटल्यानंतर दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतरही पालिका आणि पीएमपी प्रशासन इतके ढिम्म आहे, याचे वाईट वाटते. 
- प्रकाश घोणे, चेअरमन 

शत्रुंजय मंदिर रस्त्याकडून भरधाव वाहने येतात. त्यामुळे आमच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर गतिरोधक बांधा याबाबत वारंवार मागणी करूनही उपयोग झाला नाही. 
- ज्ञानेश्‍वर भरेकर, सचिव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT