pmp 
पुणे

पुणे : धावत्या बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला, अन्...

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता (पुणे) ः सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथून सुटलेली पीएमपी बस स्वारगेटला निघाली. काही अंतरावरच चालकाच्या छातीत दुखू लागले आणि तो बेशुद्ध होऊन स्टेअरिंगवर पडला. तत्पूर्वी अशा अवस्थेतही बसचा ताबा कसाबसा सावरत चालकाने ती खांबावर धडकवल्याने बाका प्रसंग टळला.

वेळ सोमवार सायंकाळ सातची. अर्थातच त्यामुळे रस्त्यावर वाहतूकही प्रचंड होती. या गर्दीतूनच प्रवाशांनी भरलेली बस माणिकबागेतून स्वारगेटला निघाली होती. सुनील साळवे (वय 55) हे बस चालवत होते. आनंदनगर चौकाजवळ बस आली असता, साळवे यांच्या छातीत अचानक कळा निघू लागल्या. काय करावे, हेच त्यांना सुचेनासे झाले. बसवरील ताबा सुटू लागला होता; पण अशा अवस्थेतही त्यांनी कसेबसे स्वतःला सावरत बसवर ताबा मिळविला. त्यातून त्यांनी पुढे असलेल्या दुचाकीस्वारांना चुकवत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला धडकवून थांबवली. त्याचवेळी ते बेशुद्ध होऊन स्टेअरिंगवर कोसळले.

दरम्यान, अपघात झाला असे वाटून बसमधील प्रवाशांचा थरकाप उडाला. चौकात वाहतूक नियमन करीत असलेले पोलिस हवालदार मोहन मोरे यांनी लागलीच बसकडे धाव घेतली. त्यांच्यासह वाहक सतीश फुलवरे, अविनाश खंडारे व इतर प्रवाशांनी चालक साळवे यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली; पण पोलिसांनी अल्पावधीतच ती सुरळीत केली.


चालक साळवे यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती नियंत्रणात आहे. त्यांनी अशा स्थितीतही प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. -मोहन मोरे, वाहतूक पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT