Rupali Chakankar On karnataka Hijab Row
Rupali Chakankar On karnataka Hijab Row sakal
पुणे

समाज काय म्हणेल या भीतीने काही बायका वड पुजतात - रुपाली चाकणकर

सकाळ डिजिटल टीम

आज वटपौर्णिमा आहे. सवाष्ण यादिवशी आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी व्रत करतात. वडाला फेऱ्या मारतात. या सणाबद्दल बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री फार लवकर समजली पण आमच्या शिक्षणासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलणारी ज्योतिबाची सावित्री अजुनही समजली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "महिलांना रुढी परंपरांमध्ये जखडून ठेवून तिचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. माझा आणि वटपौर्णिमेचा फारसा संबंध येत नाही. मी लग्न झाल्यापासून एकदाही वड पूजलेला नाही. मी आमच्या साहेबांना सांगते की तुम्हाला सात जन्म हीच पत्नी हवी असेल तर तुम्ही वडाला फेऱ्या मारा, आमच्याकडून वड पूजला जाणार नाही. माझ्या सासरच्यांनीही मला आग्रह केला नाही".

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, काही बायका समाज काय म्हणेल या भीतीपोटी वड पूजायला जातात. उरल्यासुरल्या १० - १२ टक्के बायका कपाटात ठेवलेल्या साड्या दाखवायला वड पूजायला जातात. आम्हाला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी सत्यवानची सावित्री फार लवकर समजली पण आमच्या शिक्षणासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलणारी ज्योतिबाची सावित्री अजुनही समजली नाही ,हे आमचे दुर्दैव. वडाच्या फांद्या तोडून, वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून निसर्गाचा समतोल बिघडवण्यापेक्षा चार वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद निश्चितच समाधानकारक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT