Rupali Thombre-Patil Leader of the Women ncp mns activists post defamatory text on social media pune  इसकाळ
पुणे

रुपाली ठोंबरे-पाटील यांची समाजमाध्यमांवर बदनामी; मनसेच्या 16 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मनसेच्या 16 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर बदनामीकारक मजकूर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनसेच्या 16 कार्यकर्त्यांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी ऍड. पूनम गुंजाळ यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फेसबुकवर "एक करोड ताईवर नाराज' असा ग्रुप तयार करण्यात आला होता. त्यानुसार, त्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी ऍड.गुंजाळ यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. ऍड.गुंजाळ यांनी त्याचा स्विकार केल्यानंतर त्यांना संबंधीत ग्रुपवरील मजकुरात रुपाली पाटील यांचे छायाचित्र वापरून बदनामीकारक मजकूर टाकल्याचे आढळून आले. त्यानंतर ऍड.गुंजाळ यांनी महिलांविषयी बदनामीकारक मजकूर टाकू नका, असे तेथे लिहीले. दरम्यान, सुधीर लाड याने त्याच्या वैयक्तिक फेसबुक खात्यावरुन खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित करून शिवीगाळ केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ऍड. गुंजाळ यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT