ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्याची दिशा
भोरच्या ग्रामीण भागातील जेमतेम परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये दिशा देवून त्यांचे भविष्य घडविणारे परमेश्वर कोठुळे हे विद्यार्थ्यासाठी खरोखरच परमेश्वर ठरले आहेत. गेल्या १६ वर्षांपासून ओम इन्स्टिट्यूट ॲंड कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे. सद्यःस्थितीत भोरमधील प्राथमिक शिक्षक सहकार भवन व नसरापूर शाखेत सुरू असलेल्या त्यांच्या संस्थेत सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- विजय जाधव, भोर
परमेश्वर कोठुळे हे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवण या छोट्या खेड्यातून भोरमध्ये बी.फार्म. या पदवीच्या शिक्षणासाठी आले. त्यांना शिक्षणाची आणि शिकविण्याची आवड असल्यामुळे सन २००८मध्ये त्यांनी शिक्षण घेत असतानाच बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकविण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर जीवनमूल्य जपत त सुसंस्कारीत बनावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याच विचारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केले. विद्यार्थी व पालकांच्या मागणीमुळे त्यांनी सन २०११मध्ये ओम इस्टिट्युट ॲंड कोचिंग क्लासेस या संस्थेची स्थापना करून अधिकृत शैक्षणिक संस्था सुरू केली. तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. आणि विविध क्षेत्रात हजारो विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात स्थान निर्माण केले आहे.
सद्यःस्थितीत भोरमधील प्राथमिक शिक्षक सहकार भवन व नसरापूर शाखेत सुरू असलेल्या त्यांच्या संस्थेत सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेत शिस्तबद्ध, सकारात्मक व अभ्यासपूरक वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी १० पेक्षा जास्त प्रशिक्षित शिक्षक कार्यरत आहेत. संस्थेमध्ये ग्रंथालय, स्वतंत्र डिजिटल व स्मार्ट क्लासरूम, ऑनलाइन प्रशिक्षणासाठी संस्थेचे परमडिजिटल नावाचे मोबाईल ॲप आदी अत्याधुनिक सुविधा आहेत. संस्थेत इयत्ता दहावी व बारावीसाठी नियमीत टॉपीक टेस्ट, स्टडी मटेरिअल व प्रश्नसंच, युनिट टेस्ट आणि अभ्यासक्रमाच्या सराव परीक्षा व त्यांच्या गुणांचे विश्लेषण, गुणांचे वैयक्तीक मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, विद्यार्थी व पालकांसाठी करिअर समुपदेशन करून सुसंवाद साधला जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार स्पर्धात्मक शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे संस्थेत पुणे, सातारा, कोकण व मराठवाडा येथून विद्यार्थी निवासी प्रशिक्षणासाठी येत आहेत.
यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ओम इन्स्टिट्यूट ॲंड कोचिंग क्लासेसमध्ये बारावीच्या नीट परीक्षेचे शिक्षण घेत असलेल्या २४ विद्यार्थ्यांपैकी जवळपास सर्वच विद्यार्थी नीटसाठी पात्र ठरले आहेत. १२ विद्यार्थ्यांना ४०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीत चार विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी शासकीय प्रक्रियेमधून प्रवेश मिळाला आहे. अजूनही प्रवेश प्रकिया सुरू आहे. भोरमध्ये शिक्षण घेऊन एकाच वेळी चारहून अधिक विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात प्रवेश मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. याशिवाय यावर्षी इंजिनिअरींला आठपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासकीय प्रक्रियेतून व्हीजेटीआय, सीओईपी व व्हीआयटी यासारख्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेला आहे. आजपर्यंत ओम इन्स्टिट्यूट ॲंड कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून १ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शासकीय मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजसह AIIMS, NIT, IIT, IISER या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळाला.
परमेश्वर कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओम इन्स्टिट्यूट ॲंड कोचिंग क्लासेसमधील दोन विद्यार्थिनींनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळाले आहेत. संस्थेत प्रशिक्षण घेतलेली वैष्णवी कंक हिने ९८ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आणि सिद्धी इंगुळकर हिने ९७.४० टक्के गुण मिळवून द्वितीय येण्याचा मान मिळवला. याशिवाय भोरमधील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, राजा रघुनाथराव विद्यालय, शिवाजी विद्यालय आणि नसरापूर येथील अमृता विद्यालयम या विद्यालयांमधील दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना ओम इन्स्टिट्यूट ॲंड कोचिंग क्लासेसमधील परमेश्वर कोठुळे व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. NEET, JEE, MHT-CET, IISER आणि NDA यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसोबत SSC व HSC बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीवरही भर दिला जात आहे. यशाचा प्रशिक्षणाच हाच आलेख सतत उंच राहण्यासाठी परमेश्वर कोठुळे व त्यांची शिक्षक टीम कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.