ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा
नेर फाटा- ललगुण, नेर मार्ग बिकट; उत्तर खटावमधील नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी
ऋषिकेश पवार : सकाळ वृत्तसेवा
पुसेगाव, ता. २४ : सातारा- लातूर राष्ट्रीय महामार्गावरील नेर फाटा ते ललगुण आणि पुसेगाव-फलटण राज्य महामार्गावरील नेर फाटा ते नेर या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. उत्तर खटावच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि रुंदीकरण होणे गरजेचे झाले आहे.
नेर फाटा ते ललगुण या रस्त्यावरून नेर, फडतरवाडी, पवारवाडी, नेर तलाव, नागनाथवाडी, ललगुण परिसरातील शेतमालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या गावांतील प्रवासी वाहतुकीसोबत ललगुण, डिस्कळ, मोळमार्गे फलटणकडे, तर नेर ते नेर फाटा या रस्त्यावरून राजापूर, कुळकजाई, मलवडीमार्गे दहिवडीकडे प्रवासी वाहतूक होते. या भागातील विद्यार्थी, नोकरदार या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर दररोज वापर करतात.
वर्दळ जास्त असल, तरी या रस्त्यांची रुंदी कमी आहे. त्यामुळे दोन अवजड वाहने एकमेकांसमोर आल्यावर अडचण निर्माण होते. अनेकदा ओव्हरटेक किंवा पास होताना एका वाहनाला डांबरी रस्त्यावरून खाली उतरावे लागते. अशावेळी वाहनाची गती जास्त असल्यास अपघाताची शक्यता बळावते. अशी अपघाती परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे आहे.
दरम्यान, या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खराब झाल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अनेक ठिकाणी डांबरही गायब झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड होत असून, अपघाताची भीती आहे. या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
...........
चौकट
...............
तत्काळ दुरुस्ती करा...
नेर, फडतरवाडी (नेर), रणसिंगवाडी, राजापूर, फडतरवाडी (बुध) या भागांतून फलटण-पुसेगाव राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते खराब झाले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यांवरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांतून होत आहे.
............
कोट
...........
पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येत असलेला ब्रिटिशकालीन नेर तलाव, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गुरुपरंपरेतील महान संत व तपस्वी राघवचैतन्य महाराजांचे समाधी मंदिर आणि प्राचीन श्री नागनाथ महाराज मंदिर ही स्थळे नेर फाटा ते ललगुण या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक, भाविक येथून दररोज प्रवास करतात. या भागाच्या पर्यटन वृद्धीसाठी या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
- सचिन पवार,
ग्रामस्थ, नेर.
.....................
फलटण-पुसेगाव मार्गारून नेर फाटा ते नेर गावठाणमार्गे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा रस्ता खराब झाला आहे. खड्डे बुजवण्याइतपतही रस्त्याची अवस्था राहिली नाही. त्यामुळे हा रस्ता तत्काळ नव्याने करण्यात यावा.
- सुरेश चव्हाण,
माजी सरपंच, नेर
B01367,
B01368
नेर : फाट्यापासून रस्त्यावर डांबरच नसल्याने झालेली दुर्दशा.
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.