lovell prabhu 
पुणे

"सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र'मुळे ग्रामीण, शहरी तरुणींना संधी 

अरुण सुर्वे

पुणे - "सकाळ माध्यम समूहा'ने आयोजित केलेली "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2020' ही स्पर्धा शहरासह तरुणींच्या कलागुणांना वाव देणारी ठरली. ज्यांना काहीतरी बनण्याचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी ही स्पर्धा खरोखरचं पाठबळ देणारी ठरली आहे, असे मत कोरिओग्राफर व या स्पर्धेचे दिग्दर्शक लोवेल प्रभू यांनी व्यक्त केले. 

"सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2020' या स्पर्धेविषयी प्रभू म्हणाले की, तरुणींचा व्यक्तिमत्त्वविकासासह त्या सर्वगुणसंपन्न होण्यासाठी; तसेच त्यांना व्यासपीठ मिळण्यासाठी मोठमोठ्या शहरांमध्येच अशा स्पर्धा होतात. मात्र, "सकाळ'ने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करून महाराष्ट्रातील तरुणींना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. विशेष म्हणजे आम्ही फक्त पुणेच नव्हे; राज्यातील आठ ते दहा शहरांमध्ये प्रत्यक्षात जाऊन तरुणींच्या ऑडिशन्स घेतल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामधून अंतिम फेरीसाठी 21 जणींची निवड करण्यात आली. त्यामुळे शहरी अन्‌ ग्रामीण भागातील तरुणींना यामध्ये संधी मिळाली. 

या स्पर्धेमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, सामाजिक क्षेत्र, आर्किटेक्‍टसह नृत्य अन्‌ अभिनयातील तरुणींनीही सहभाग घेतला. विशेष म्हणजे मेहनत, टॅलेन्ट, सौंदर्याच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळातच आपल्याला काहीतरी करायचं असेल, तर तो रस्ता सोपा नसतो. मात्र, आपण स्वप्न बाळगून अन्‌ ध्येय निश्‍चित ठेवले तर नक्कीच ते साध्य करू शकतो. त्यामुळे यातील अनेक तरुणी चित्रपटसृष्टी, मालिका, जाहिरात अन्‌ मॉडेलिंगमध्ये पाहायला मिळतील, असा विश्‍वास प्रभू यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT