Russia Ukraine : गहू निर्यातीत मोठी वाढ  sakal
पुणे

Russia Ukraine : गहू निर्यातीत मोठी वाढ

रशिया आणि युक्रेन युद्धाचा भाववाढीवर परिणाम

प्रविण डोके

पुणे: मागील १० दिवसांमध्ये गव्हाचे भाव क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा गव्हाच्या भाववाढीवर परिणाम झाला आहे. रशिया जगातील मोठा गहू उत्पादक देश आहे तर युक्रेनचा गहू निर्यातीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. मात्र, युद्धामुळे अनेक देशात गव्हाची होणारी निर्यात थांबली आहे.

भारतातून सध्या मोठ्या प्रमाणावर गहू निर्यात होत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा बाजारात नवे पीक येते, तेव्हा भाव स्वस्त होतात. परंतु, मागणीमुळे गव्हाचे भाव वाढले आहेत. येणाऱ्या काळात गव्हाचे भाव आणखीन वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी नवा गहू बाजारात आणताना दिसून येत नसल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी अभय संचेती यांनी सांगितले.

किराणा भुसार विभागामध्ये गव्हाची दररोज साधारणतः २० ट्रक इतकी आवक होते. बाजारात खानदेश, मध्यप्रदेश, गुजरात या भागातून गव्हाची आवक होते. मात्र, यंदा नवीन मालाची आवक कमी आहे. बाजारात जुन्या मालाचा साठा कमी आहे. परंतु सध्या बाजारात गव्हाला मागणी आहे. त्यामुळे भाववाढ झाली आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा गहू उत्पादक देश आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात वाढून गव्हाचे दर आणखी वाढतील, असे धान्याचे व्यापारी किरण छाजेड आणि जेठमल दादीच यांनी सांगितले.

सर्वांत मोठा गहू उत्पादक देश रशिया

रशिया जगातील मोठा गहू उत्पादक देश आहे तर युक्रेनचा गहू निर्यातीत तिसरा क्रमांक लागतो. मागीलवर्षी रशियाने ३.५ कोटी टन गव्हाची निर्यात केली होती तर युक्रेनने २.४ कोटी टन गहू निर्यात केला होता. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे गव्हासाठी रशिया किंवा युक्रेनवर अवलंबून असलेल्या देशांत गव्हाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे इतर देशातून गव्हाची आयात करत आहेत.

काय आहेत भाववाढीची कारणे

रशिया व युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम

निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू

बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त

गुजरात येथून होणारी आवक उशिरा

गव्हाचा प्रकार मार्च २०२१ भाव मार्च २०२२ भाव

मिलबर क्वालिटी २०००-२०५० २४५०-२५५०

खानदेश लोकवन २३००-२४५० २७५०-२८५०

मध्यप्रदेश लोकवन २४००-२९०० २७००-३२००

गुजरात लोकवन २४५०-२८५० २८००-३२००

नविन हंगाम सुरू झाल्यावर शक्यतो भाव कमी असतात. मागीलवर्षी केंद्र सरकारने मिलबर गहू २००० ते २०५० रुपयांनी क्विंटलने खरेदी केला. इतर देशातून मागणी जास्त असल्याने यंदा तोच गहू २४५० ते २५५० रुपयांनी खरेदी करण्यास सुरू केला आहे. ही खरेदी मोठ्या प्रमाणावर आहे. हा सर्व गहू निर्यात करण्यासाठी खरेदी केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या गव्हाच्या भावात यंदा तेजी राहण्याची शक्यता आहे.

- अभय संचेती, धान्याचे व्यापारी, मार्केट यार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT