पुणे

रशियाचे युक्रेनमध्ये मतदान

CD

युक्रेनच्या भूमीत रशियाचे मतदान

विलीनीकरण झालेल्या प्रदेशांतही ‘ड्युमा’ निवडणुकीची प्रक्रिया

किव्ह, ता. २० (वृत्तसंस्था) : ‘ड्युमा’ या रशियन संसदेसाठी मतदान होत असून, रशियाने विलीन करून घेतलेल्या युक्रेनच्या प्रदेशातील रहिवाशांनीही प्रथमच या मतदानात सहभाग घेतला. या मतदानाच्या माध्यमातून या प्रदेशावरील पकड मजबूत करण्याचा रशियाचा प्रयत्न दिसून येत असल्याचे मानले जाते. युक्रेनने या मतदानाचा निषेध केला असून, मतदानात सहभागी होण्यासाठी नागरिकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.
युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशियाने डोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिशिया या चार भागांतील मोठा प्रदेश रशियाच्या ताब्यामध्ये आहे. हा प्रदेश विलीन झाल्याची घोषणा रशियाने केली होती. मात्र, या प्रदेशावर रशियाला पूर्णपणे ताबा मिळविता आलेला नाही आणि या विलिनीकरणाला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली नाही. युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच ड्युमासाठी मतदान होत आहे. या चार प्रदेशांमध्ये ३५ लाखांहून अधिक मतदार असून, सीमेलगतच्या काही भागात ऑगस्टपासूनच मतदान सुरू करण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणासाठी मतदानाचा कालावधी वाढविण्यात आल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाने २०१४मध्ये विलीन करून घेतलेल्या क्रायमिया या द्विकल्पावरही मतदान होत आहे. डोनेत्स्कमधील एका मतदान केंद्रावरील छायाचित्र प्रसिद्ध झाले असून, त्यामध्ये एक मतदार मतपत्रिका पेटीत टाकत असून, त्याच्या शेजारी एक सशस्त्र सैनिक उभा आहे.

वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न
युद्धजन्य परिस्थितीमध्ये प्रथमच ड्युमा निवडणूक होत आहे. या निवडणुकीतून सरकारचे राजकीय वर्चस्व अधिक मजबूत करतानाच, जनतेचा या युद्धाला पाठिंबा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी केलेल्या भाषणात या प्रदेशांतील मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. या भागातील नागरिक रशियात ‘पुनर्विलीन’ झाल्यानंतर प्रथमच ड्यूमासाठी मतदान करीत असल्याचे त्यांनी सांगितले. युद्धात सहभागी असलेले रशियन सैनिकही मतदान करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘नागरिकांचा निर्णय आणि त्यांचा निर्धार यामुळे लाखो लोक रशियन सैनिकांच्या पाठीशी उभे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. समान मूल्ये, ऐतिहासिक स्मृती आणि मातृभूमीवरील प्रेमामुळे रशियन जनता एकसंध आहे.’’

युक्रेनकडून विरोध
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या प्रदेशांतील मतदान बेकायदा असल्याचे म्हटले असून, परदेशी सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी या निवडणुकीला मान्यता देऊ नये, असे आवाहन केले आहे. या मतदानाच्या आयोजनात सहभागी होणाऱ्या युक्रेनियन नागरिकांवर गुन्हेगारी कारवाई होऊ शकते, असा इशाराही युक्रेन सरकारने दिला आहे. युक्रेनमधील नऊ मानवी हक्क संघटनांच्या आघाडीने रशियाच्या ताब्यातील भागातील नागरिकांना मतदानापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. रशियाच्या ताब्यातील प्रदेशांतील मतदानाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणखी एक स्पष्ट उल्लंघन आहे. युरोपीय महासंघ या तथाकथित निवडणुकांना किंवा त्यांच्या निकालांना कधीही मान्यता देणार नाही, असे युरोपीय आयोगाचे प्रवक्ते ख्रिश्चन विगांड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : सरकारने कितीही चांगली कामगिरी केली, तरी त्यावर टीका करणे हेच विरोधी पक्षाचे काम- खासदार उपेंद्र कुशवाह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT