पुणे

#SaathChal ‘साथ चल’साठी रोटरीचाही निर्धार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी -  ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या ‘साथ चल’ या उपक्रमात सर्व सभासदांसह सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प निगडी रोटरी क्‍लबने शुक्रवारी (ता. २९) केला.

संभाजीनगर येथील रोटरी क्‍लब सभागृहात वार्षिक सभेचे आयोजन केले होते. या वेळी अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, सचिव डॉ. प्रवीण घाणेगावकर आणि उपाध्यक्ष विजय काळभोर व्यासपीठावर उपस्थित होते. बहुसंख्य उद्योजक, डॉक्‍टर्स, वकील, सीए या क्‍लबचे सदस्य आहेत. सर्व मान्यवर सभासद या वेळी उपस्थित होते. राष्ट्रगीतानंतर सभेचे कामकाज सुरू झाले. या वेळी रोटरी 

क्‍लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती पदाधिकाऱ्यांनी सभासदांना दिली. 

क्‍लब अध्यक्षांच्या संमतीनंतर ‘सकाळ’च्या ‘साथ चल’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. शहरातून संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करताना शक्‍य तिथे रोटरीच्या सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सभासदांनी उत्स्फूर्तपणे या संकल्पनेला दाद दिली आणि सहभागी होण्याची ग्वाही दिली. 

क्‍लबच्या वतीने दिंडीप्रमुखांना प्रथमोपचार पेटी वाटप करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Milk Union : पुणे दूध संघातील गैरव्यवहारांची चौकशीची टिळेकरांची मागणी; कारवाई करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

Alandi News : पुरामुळे नुकसान झालेल्या नागरी सुविधांसाठी आळंदीला 10 कोटींचा निधी मंजूर

Latest Marathi News Update : आयशर ट्रक अन् एसटीच्या धडकेत चौघे गंभीर, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Ashadhi Wari Health Services: कमला नेहरू रुग्णालयात १० अतिदक्षता खाटा राखीव; वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी महापालिकेचा आरोग्‍य विभाग सज्ज

Pune News : धायरी फाटा उड्डाणपुलाला भेग; पूल सुरक्षित असल्याचा प्रशासनाचा खुलासा

SCROLL FOR NEXT