पिंपळी (ता. बारामती) - येथे संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा आल्यानंतर मेंढ्यांनी प्रदक्षिणा घालून पालखीचे स्वागत केले. 
पुणे

#SaathChal मेंढ्यांच्या प्रदक्षिणेने भारावला पालखी सोहळा

सकाळवृत्तसेवा

डोर्लेवाडी - विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे निघालेल्या संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हजेरीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

सोमवारी (ता. १६) बारामतीचा मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा गावात दाखल होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. येथील मेंढपाळ शेतकरी अनंता केसकर, अर्जुन केसकर, गणपत केसकर, ज्ञानदेव केसकर, अंकुश केसकर यांनी प्रथेप्रमाणे आपल्या मेंढ्या स्वागतासाठी आणल्या होत्या. टाळ-मृदंगाचा नाद व पुंडलिक वरदाचा गजर होताच हजारो भाविकांच्या गर्दीत मेंढ्यांनी पाच प्रदक्षिणा घालून रिंगण सादर केले. त्यानंतर छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, सरपंच राजेंद्र केसकर, खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब भिसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश देवकाते, मोहन बनकर, ग्रामविकास अधिकारी संजय गावडे, नितीन देवकाते, सुनील बनसोडे व इतर पदाधिकाऱ्यांनी बैल जोडी व अश्‍वाची पूजा करून पालखी सोहळा प्रमुखांचे स्वागत केले. त्यानंतर पालखी हनुमान मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी कढी-भात व पिटल-भाकरी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हनुमंत तांबे यांच्या वतीने दूध वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा काटेवाडीकडे मार्गस्थ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीषण अपघात! ट्रेलर-कारची जोरदार धडक, आर्मी कुटुंबाचा दुर्दैवी अंत, ३ चिमुकल्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Mantralaya Employees Strike : मंत्रालयातील सर्व कामकाज ठप्प होणार? लिपिकांचा २५ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंदचा इशारा

Varsha Turkar Case: वर्षा तुरकर हत्या प्रकरण; आरोपींची संख्या सहा ;फरार दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Nagpur News: नागपूर शहरात अवजड वाहनांना बंदी ; रहिवासी, बाजारपेठ परिसरात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ‘नो-एंट्री’

New Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ दीड तासांवर; आठ पदरी नवीन महामार्ग उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

SCROLL FOR NEXT