उरुळी कांचन (ता. हवेली) - तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जमलेले भाविक. 
पुणे

#SaathChal तुकोबांचे उरुळीत स्वागत

सकाळवृत्तसेवा

उरुळी कांचन - संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी आठच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील ग्रामस्थांची सेवा स्वीकारून दुपारी एक वाजता पालखी उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत पोचली. या वेळी भैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजाराम कांचन, कार्याध्यक्ष महादेव कांचन, खजिनदार लक्ष्मण जगताप व गुरुदत्त भजनी मंडळाचे सुरेश कांचन यांनी पालखीला पुष्पहार घालून पालखीचे स्वागत केले. 

पालखी सोहळा थेऊर फाटा येथे येताच महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले, तर सुनीता धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली यशस्विनी तनिष्का गटाने सुमारे पाचशे कापडी पिशव्यांचे वाटप केले. पालखी कुंजीरवाडी येथे येताच सरपंच अनुराधा कुंजीर, उपसरपंच दत्तात्रेय कुंजीर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष कुंजीर यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, उपस्थित होते. 

पालखी नायगाव फाट्यावर येताच हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या अध्यक्षा पूनम चौधरी, उपाध्यक्ष अरुण चौधरी, व्यवस्थापक अनिल जवळकर उपस्थित होते. 

पेठ फाटा येथे जी. बी. चौधरी फाउंडेशनच्या वतीने नीलेश चौधरी यांनी पालखीचे स्वागत केले. सोरतापवाडी येथे सरपंच सुदर्शन चौधरी, उपसरपंच स्वाती चोरघे, माजी उपसरपंच गणेश चौधरी यांनी पालखीचे स्वागत केले. तसेच ग्रामपंचायतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य किट व पिण्याच्या पाण्याचे वाटप केले. 

पालखी चौधरी माथ्यावर येताच उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने यशवंत कारखान्याचे माजी अध्यक्ष के. डी. कांचन, ग्रामपंचायत सदस्य संतोष हरिभाऊ कांचन, सुनील दत्तात्रेय कांचन, भाऊसाहेब कांचन, रोहित ननावरे, सारिका मुरकुटे, ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अमित कांचन, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष आबासाहेब कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, अलाईट ग्रुपचे आकाश छाजेड यांनी पालखीचे स्वागत केले. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, महावितरणच्या मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. बुंदेले, उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, मंडलाधिकारी दीपक चव्हाण व त्यांचे सहकारी उपस्थित होते. पालखी सोहळा दुपारी दीड वाजता येथील हनुमान मंदिरात पोचला. दुपारी तीनच्या सुमारास पालखी यवत (ता. दौंड) येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exams 2026 Postponed : MPSC च्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

SCROLL FOR NEXT