पुणे

द ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्डने श्री सदाशिव वेळापूरकर महाराजांचा सन्मान

CD

PNE26W53849
सोलापूर : ष.ब्र. सदाशिव शिवाचार्य महास्वामी व गायत्री बिराजदार.

सदाशिव शिवाचार्य महास्वामी,
गायत्री बिराजदार यांचा श्रीलंकेत सन्मान
‘द ग्लोबल अचीव्हर्स ॲवॉर्ड २०२६’ने कार्याचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३ : ष.ब्र. १०८ सद्‍गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामी व गायत्री बिराजदार यांचा श्रीलंकेत सन्मान झाला. शिक्षण, समाजसेवा, धार्मिक, सांस्कृतिक व मानवतावादी कार्याची दखल घेतली. कोलंबो येथील पेगासस रिफ येथे पुरस्कार सोहळा झाला.
सद्‍गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामी धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यासोबत ते समाजसेवाही करतात. ‘समाजाचे आपण सेवक आहोत’ या भावनेतून ते काम करतात. व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, पाखंडपणा व सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती करतात.
मठाच्या माध्यमातून गुरुकुल चालविले जाते. येथे संस्कारक्षम व मूल्याधिष्ठित शिक्षण दिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले जाते. गायत्री बिराजदार १६ वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी त्या काम करतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातही त्यांचे कार्य आहे. त्यांनी १२ वर्षे कोणतेही वेतन अथवा मानधन घेतले नाही. विनामूल्य शिक्षणसेवा बजावली. धार्मिक कार्यासोबत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व मानवतावादी क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्यात आली. त्याबद्दल दोघांना ‘द ग्लोबल अचीव्हर्स ॲवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT