Sadhu Vaswani Pul sakal
पुणे

Sadhu Vaswani Pul : साधू वासवानी पुलाचे पाडकाम सुरू;नवीन पुलाच्या कामाला होणार तातडीने सुरुवात

कोरेगाव पार्क परिसरातील जुन्या झालेल्या साधू वासवानी पुलाच्या पाडकामाला अखेर सुरुवात झाली आहे. पालखी सोहळ्यानंतर पाडकाम करण्यात येणार होते, त्यापूर्वी चार दिवस अगोदरच पाडकाम करणे सुरू झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील जुन्या झालेल्या साधू वासवानी पुलाच्या पाडकामाला अखेर सुरुवात झाली आहे. पालखी सोहळ्यानंतर पाडकाम करण्यात येणार होते, त्यापूर्वी चार दिवस अगोदरच पाडकाम करणे सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तेथे नवीन पूल उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

साधू वासवानी पुलास ५० वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. हा पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याच्या अहवालानंतर महापालिकेने हा पूल पाडून तेथे नवीन पूल बांधणीचे नियोजन केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मागील वर्षी १५ एप्रिल रोजी नवीन पूल बांधण्यासाठी भूमिपूजनही झाले. मात्र, त्यानंतरही पुलाच्या कामास विलंब होऊ लागला होता. महापालिका प्रशासनाच्या विशेष प्रकल्प विभागाकडून साधू वासवानी पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्याचबरोबर वाहतुकीचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाबरोबर सातत्याने बैठका सुरू होत्या. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही संबंधित काम प्रलंबितच होते. त्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून या कामाला गती देण्यात आली.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून पूल पाडण्यासाठी परवानगी प्राप्त झाली होती मात्र लोकसभा निवडणूक, त्यानंतर मतमोजणीमुळे पाडकाम आणखी पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर पालखी सोहळ्यानंतर काम होणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी जाहीर केले होते. तत्पूर्वीच, आयुक्त डॉ. भोसले यांनी संबंधित कामाची पाहणी करून पुढील प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच जुन्या पुलाचे पाडकाम करण्यास सुरुवात झाली आहे. हे काम काही दिवसांत पूर्ण होईल, त्यानंतर नवीन पुलाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे.

साधू वासवानी पुलाच्या पाडकामाला चार दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. हे काम लवकर पूर्ण करून नवीन पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. नवीन पूल झाल्यास या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल.

- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

ट्रेन बुकिंग बनले आणखी सोपे! Cleartrip आणि IRCTC ची पार्टनरशिप; पाहा तिकीट कसं मिळवायचं? एका क्लिकमध्ये

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

SCROLL FOR NEXT