विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत सूचना द्या
पालकांसह शिक्षकांची मागणी ः नियमावली जाहीर करा
अकोले, ता. ३१ : तालुकास्तरावर लवकरच क्रीडा स्पर्धा, कला महोत्सव, विज्ञान-गणित प्रदर्शन आदी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांसाठी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची ने-आण करताना कोणत्या प्रकारची वाहतूक व्यवस्था वापरावी, याबाबत शासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे.
काळी-पिवळी टॅक्सी अथवा बस उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी नेण्यासाठी शाळा प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण होते. मागील वर्षी क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची चारचाकी वाहनातून वाहतूक करताना अपघात झाला होता. त्यानंतर पालघर प्रशासनाने संबंधित मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित केली होती. त्यामुळे यंदा अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आधीच ठोस नियमावली जाहीर करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करताना वाहनाचा प्रकार, आसनक्षमता, विद्यार्थ्यांची संख्या, वाहनाची फिटनेस तपासणी, विमा, परवाना, चालकाची पात्रता तसेच आवश्यक सुरक्षा साधनांबाबत स्पष्ट निकष निश्चित करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शाळांना उपलब्ध असलेल्या स्थानिक वाहतूक साधनांचा वापर करताना मुख्याध्यापक व शिक्षकांवर नंतर कारवाईची वेळ येऊ नये, यासाठी जबाबदारीची स्पष्ट व्याख्या शासनाने करावी, अशी मागणी होत आहे.
क्रीडा, कला, विज्ञान व गणित प्रदर्शनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, या उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना त्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये. विद्यार्थ्यांची वाहतूक कशी व कोणत्या वाहनातून करावी, याबाबत शिक्षक व मुख्याध्यापकांना स्पष्ट आणि लेखी मार्गदर्शक सूचना मिळाल्यास शाळा प्रशासनाचीही मोठी अडचण दूर होणार आहे.
------------
सुरक्षित वाहतुकीचे निकष स्पष्ट करा
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध पर्याय लक्षात घेऊन शासनाने सुरक्षित वाहतुकीची पर्यायी व्यवस्था, परवानगीची प्रक्रिया, वाहनांची क्षमता आणि सुरक्षा निकष याबाबत तातडीने स्पष्ट निर्देश जारी करावेत, अशी मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.